शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम-24)
पिण्याचा पाण्याची बॉटल घेण्याचा बहाण्याने आलेल्या दोन जणांनी किराण दुकानदार महिलेच्या गळ्यातील १ तोळा ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५८ हजार ४०० रु . किमंतीचे गंठण चोरुन नेले आहे .
वडगाव रासाई , ता . शिरुर येथे हा प्रकार घडला .याबाबत दोन अज्ञात इसमाचा विरोधात सौ. सुरेखा अनिल कुंभार वय ४६ वर्षे व्यवसाय. किराण दुकान, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि पुणे यांनी फिर्याद दिली आहे .
दिनांक ४ जून रोजी वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे येथे शांभवी किराणा दुकानात एक अज्ञात इसम पाण्याची बॉटल घेण्याचे बहाण्याने आला व सुरेखा कुंभार यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण त्याची किंमत १ लाख ५८ हजार ४०० रूपये आहे . ते गंठण जबरदस्तीने ओढून चोरून घेवून गेले .
याबाबत पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सबइन्सपेक्टर नकाते करीत आहे .