धार्मिंक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} प्रीतम प्रकाश नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्था मंदिर वर्धापनदिन उत्सव शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
वर्धापनदिनानिमित्त व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सवाच्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत रुद्राभिषेक होणार असून, त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्यात येईल. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाआरती व त्यानंतर ८ ते ९ या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांना शिरूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


