Uncategorized
Related Articles
Check Also
Close
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )मल निस्सारण व सांडपाणी प्रकल्प तात्काळ चालू करून घोडनदीची पर्यावरण हानी थांबवावी यासह शहरातील अन्य प्रश्नांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे (१० जून पासून) आमरण उपोषण सुरु केले आहे .
यावेळी त्यांच्यासमवेत शिरूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे आदी उपस्थित होते.
मोकाट कुत्रे व निर्बिजीकरण मोहिमेतील भ्रष्टाचार संदर्भात चौकशी करावी. शिरूर नगरपालिकेतील विज चोरीबाबत कारवाई करावी .नगरपालिकेतील सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावेत. सफाई कर्मचाऱ्याच्या व्हायरल झालेल्या क्लिप संदर्भात कारवाई करण्याबाबत.नगरपरिषद मालकीचे भंगार साहित्य विल्हेवाट प्रकरणी गुन्हे दाखल करावेत या विविध विषयासंदर्भात सय्यद हे आमरण उपोषणास बसले आहेत.