Uncategorizedविशेष

पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरुर येथे वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित

सतरा कमानी पुला जवळ वाहतूक नियंत्रण दिवा कार्यान्वित करताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
सतरा कमानी पुला जवळ वाहतूक नियंत्रण दिवा कार्यान्वित करताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)पुणे अहिल्यानगर महामार्गावर न्हावरा फाटा व सतरा कमानीच्या पुलाजवळ शिरूर पोलीस यांनी चार वाहतूक नियंत्रक दिवे बसवले आहेत.  वाहतूक नियंत्रक दिवे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या  उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले .
यावेळी बोलताना केंजळे यांनी सांगितले की पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता व वाहनाच्या मोठा स्पीड यामुळे अपघात होत होते . स्पीड कमी व्हावा व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने पुणे अहिल्यानगर रस्त्यावर न्हावरा फाटा व घोडनदीवरील सतरा कमानीचा पूलाजवळ कर्डे एमआयडीसीतील आयएफबी कंपनीचा सीआरएस फंडातुन हे वाहतुक नियंत्रक दिवे बसविले असून गंगा पेट्रोल पंप जवळ ही दोन दिवे बसविण्यात येणार आहेत .
यावेळी आयएफबी कंपनीचे एच आर काशिराम मेस्त्री , संतोष निंबाळकर , प्रवीण बांदल , कुणाल परदेशी , वाहतूक पोलीस राजेंद्र वाघमोडे , शेखर झाडबुके , ज्ञानदेव गोरे , विकी मैड , नरेंद्र सुंभे , भाग्यश्री जाधव , गणेश देशमाने आदी उपस्थित होते .

शिरूर मधून पुणे-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग गेला असुन सदरचे महामार्गावर न्हावरा फाटा या ठिकाणी आहिल्यानगर बाजुकडुन येणारी जड-अवजड व इतर वाहतुक ही न्हावरे मार्गे चौफुला येथे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणामध्ये जात असते. या ठिकाणाहून मोठया प्रमाणामध्ये वाहतुक होत असताना आहिल्यानगर मार्गे येणारी वाहतुक ही रोडला उतार असल्याने जोरात येत असते. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी न्हावरा फाटा चौक व रोड क्रॉसींग एकाच ठिकाणी असल्याने ब-याच वेळा चालकांना अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी सतत अपघात होवुन वाहतुक थांबत असे तसेच सतरा कमान चौक या ठिकाणी पुणे बाजुकडुन येणारी वाहतुक ही रोडला तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग हा वाढुन रात्रीच्या वेळी रोड क्रॅसिंग व चौकाचा अंदाज येणारा कोणताही सुचना देणारा फलक नसल्याने सदर ठिकाणी सतत अपघात होत होते. शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दोन्ही ठिकाणी अपघातांचे वाढते प्रमाण पाहुन दोन्ही ठिकाणी समक्ष जावुन पाहणी करून अपघातांचे प्रमाण कसे कमी करता येईल याची पाहणी केली व त्यावेळी सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहन चालकांना चौकाचा अंदाज येण्यासाठी तिथे सौर उर्जावर चालणारे सिग्नल बसविण्यासाठी प्रयत्न करून करडे येथील आयएफबी कंपनीचे एच..आर.. हेड काशीराम मेस्त्री यांचे माध्यमातुन न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर उर्जावर चालणारे सिग्नल बसविण्यात आले असुन भविष्यात सिग्नल यंत्रणेचा फायदा हा सर्व वाहन चालकांना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button