क्राईम

पाण्याची बॉटल घेण्याचा बहाण्याने दुकानात येवून दुकानदार महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा चोरटा जेरबंद


शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसूत्र जबरीने चोरुन नेणा-या  अट्टल चोरास  अटक करुन त्यांचे कडुन ८ जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात येवून १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकुण १०लाख १० हजार रुपये किमंतीचा मुददेमाल स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी हस्तगत केला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मार्च२०२५ रोजी ग वंदना रोहिदास शेटे वय ३३ व्यवसाय – स्नॅक्स सेंटर रा. पिंपरी दुमाला ता शिरुर जि पुणे या रांजणगाव चौक येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटर मध्ये उभ्या असताना दोन अनोळखी मोटार सायकल वरुन दुकानाचे समोर आले त्यापैकी एक जण हा दुकानात आला व त्याने पाण्याची बॉटल द्या असे म्हणून शेटे यांना ५० रुपये दिले. त्यावेळी शेटे यांनी पाण्याचे बाटलीचे पैसे घेवून उरलेली रक्कम त्यांना परत देणे करीता दुकानातील पैश्यांच्या ड्रावर मध्ये वाकुन त्यांना पैसे परत देत असताना अनोळखी इसमांने त्यांचे गळयातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने ओढुन घेवुन दुकाना बाहेर स्पोर्टस बाईक सह उभा असलेला साथीदारसह चोरी करुन पळुन गेला होता . यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती .
या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन कडोल तपास पथक करीत होते. तपासा दरम्यान घटनास्थळांवरील सी. सी. टि. व्हि .फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करते वेळी वापरलेली स्पोर्टस बाईक टि. व्हि .एस .अपाची कंपनीची असल्याचे निष्पन्न झाले . तसेच दरम्यानच्या काळात शिरुर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी ही अश्या पध्दतीचे गुन्हे घडल्याने पिंपरी चिंचवड येथील गुन्हे शाखेचे पथक, आळंदी व चाकण पोलीस स्टेशनकडील तपास पथके अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे ही या

आरोपीचा शोध घेत होते.
आरोपी यांचा शोध घेत असताना अश्या प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच जेल रिलीज झालेले गुन्हेगार यांना चेक केले गेले .तसेच सर्व घटनास्थळांवरील सी .सी. टि. व्हि. फुटेज प्राप्त करुन ती एकत्रित करुन त्यांची तपासणी करुन आरोपीचा जाणेचा व येणेचा मार्ग निश्चित करून सदर मार्गावर गेले दहा दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनकडील स्टाफसह संयुक्तरीत्या सापळे लावण्यात आले होते . परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासण्यात आले. तसेच सर्व घटनास्थळांवरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले, तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडुन माहिती काढून त्या आधारे सदरचा गुन्हा हा मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय ३८ रा. लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड यांने त्याचा साथीदार नामे शरद बापू पवार रा लोणी सय्यदमीर ता आष्टी जि बीड याचेसह केला असल्याचे निष्पन्न झालेने या आरोपीचा शोध घेत असताना आरोपी मारुती रामनाथ
आंधळे हा अहिल्यानगर ते शिरुर त्यांचेकडे असलेल्या स्पोर्टस बाईक वरुन येणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळालेने त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरुर जवळ सतरा कमान पुलाचे अलीकडे सापळा लावुन त्याला टि .व्हि. एस कंपनीची अपाची आर १६० मॉडेलची मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले . त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा त्यांचा मित्र शरद बापू पवार रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी .जि .बीड यांचे सह केल्याचे  सांगितले तसेच त्यांनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच कर्जत ,जि . अहिल्यानगर पोलीस स्टेशन हददीत अश्या प्रकाराचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हयात वापरलेली टि. व्हि. एस. अपाची मोटार सायकल व एकुण ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण किंमत दहा लाख दहा हजार रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे दत्ताजीराव मोहिते, कुलदिप संकपाळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा .राजु मोमीन, पो.हवा .संजु जाधव, पो.हवा. योगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार सागर धुमाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार योगेश गुंड, पोलीस अंमलदार संतोष सांळुखे, पोलीस अंमलदार खरबस, साळवे यांनी केला .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button