क्राईम

वीजेच्या शॉक  बसून १९ वर्षीय पर प्रांतीय  तरुणाचा मृत्यू; 

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24):
शिरूर येथील मार्केट यार्ड परिसरात वीजेचा शॉक  बसून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव रिंक (सरिंक) साकेत (वय १९, रा. चौराहा प्लांट, पोस्ट नावुनकला, हनुमान चौक, जिल्हा रेवा, मध्य प्रदेश) असे आहे. या घटनेची खबर अखिलेश कुमार चिंतामणी पटेल (वय २४, व्यवसाय चालक, रा. इमहकलन, पोस्ट जोधपूर, ता. नईगढ़ी, जिल्हा रिवा, मध्य प्रदेश) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, अखिलेश पटेल हे १ जानेवारी रोजी रात्री ट्रक घेऊन शिरूर येथील बजरंग ट्रेडिंग कंपनीत कडे (माल) भरण्यासाठी आले होते. मार्केट यार्डमधील लिलावानंतर २ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या ट्रकमध्ये माल लोड करून वजनकाटा करण्यात आला. त्यानंतर मालाची बिल्टी आणण्यासाठी गेले असताना, परिसरात कोणाला तरी विद्युत धक्का लागल्याची माहिती मिळाली.
तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, रिंक साकेत हा तरुण विद्युत धक्का बसून ट्रकजवळ पडलेला आढळून आला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने शिरूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात अ.म.रजि. नं. ०२/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली असून, पुढील तपास  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साबळे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button