राष्ट्रीयविशेषशैक्षणिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी ग्रामीण विभागातील ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास जाहीर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी ग्रामीण विभागातील ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तेची आणि उल्लेखनीय कार्याची ही पावती मानली जात असून शिरूर परिसरासाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.
महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध व पारदर्शक प्रशासन, अद्ययावत पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक व समाजाभिमुख उपक्रम, संशोधन व आविष्कार कार्य, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
‘माझी आई माझ्या कॉलेजात’सारखा भावनिक उपक्रम, ‘रसिकलाल धारिवाल सामान्य ज्ञान स्पर्धा’, संशोधन व आविष्कार उपक्रम, प्रभावी प्लेसमेंट सेल, आधुनिक मूल्यमापन प्रणाली तसेच विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप्सच्या दृष्टीने राबविण्यात आलेले उपक्रम या सन्मानामागील महत्त्वाची कारणे ठरली आहेत.
महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष . धरमचंद फुलपगर, सचिव नंदकुमार निकम यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, समिती समन्वयक डॉ. एस. बी. भोईटे, समिती सदस्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे यश साध्य झाले.
तसेच माजी विद्यार्थी, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्यही या गौरवात मोलाचे ठरले आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button