Uncategorizedराष्ट्रीयसामाजिक

ड्रग्स च्या मागे हरवणारी पिढी… आणि आपली सामूहिक जबाबदारी: डॉ. स्वप्ननील भालेकर

शिरूर –पारनेर-श्रीगोंदा परिसर हा कष्टकरी माणसांचा, संस्कारांचा आणि शिक्षणाकडे आणि प्रामाणिक व्यवसायाकडे कल असणाऱ्या तरुणाईचा परिसर म्हणून ओळखला जात होता.पण आज एक अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर उभी आहे मेफेड्रोन (MD) नावाचा अमली पदार्थ हळूहळू आपल्या घरांमध्ये, गल्ल्यांमध्ये आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात शिरकाव करत आहे.ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही.ही पालकांची झोप उडवणारी,शिक्षकांना अस्वस्थ करणारी,आणि समाजाच्या भविष्यासमोर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे.

मेफेड्रोन म्हणजे काय — आणि ते इतके धोकादायक का?मेफेड्रोन हा एक कृत्रिम ड्रग आहे जो: तो मेंदूवर थेट परिणाम करतो, क्षणिक “उत्साह” देतो, पण हळूहळू निर्णयक्षमता, भावनिक स्थैर्य आणि भविष्य उद्ध्वस्त करतो

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

सुरुवात “फक्त एकदा घेऊन पाहू* “ इथपासून होते.आणि शेवट व्यसन, गुन्हेगारी, मानसिक आजार किंवा अगदी मृत्यू पर्यंत जाऊन थांबतो.

पालकांनी काय करायला हवे?आज पालक म्हणून आपली भूमिका फक्त शाळा–कॉलेज–फीस इथपर्यंत मर्यादित ठेवता येणार नाही. आजकाल पालकांना वाटतं मुलांच्या शाळेचा खर्च केला , पाहिजे त्या गोष्टी पुरविल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली .. *जागे व्हा पालकांनो .. आपली मुलं हातातून जाण्याआधी जागे व्हा ..*

आपल्या मुलांशी दररोज संवाद ठेवा — फक्त चौकशी करून नका , संवाद साधा , ऐकून घ्या. मोबाईल, मित्रपरिवार, वाढलेले खर्च याकडे डोळस लक्ष ठेवा.. गरज पडल्यास छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब मागा.. मुलांच्या वागण्यात अचानक होणारे बदल (राग, एकटेपणा, सारखे पैसे मागणे, झोप न लागणे) दुर्लक्ष करू नका.

“आपल्या घरात असं होणार नाही” हा भ्रम सोडा. जागे व्हा! गरज वाटल्यास समुपदेशन घ्यायला अजिबात संकोच करू नका.समाजाने आणि शिक्षकांनी काय करायला हवे?*हा प्रश्न एका घरापुरता मर्यादित नाही.समाज म्हणून आपली देखील जबाबदारी आहे  शाळा–कॉलेजमध्ये नियमित जनजागृती सत्रे आयोजित करावीत, खेळ, कला, निसर्ग, सेवा याकडे युवकांना वळवणे, संशयास्पद गोष्टी “आपल्याला काय?” असे म्हणत शिक्षकांनी दुर्लक्षित करू नयेत , व्यसनमुक्ती केंद्रे व हेल्पलाइनची माहिती खुलेपणाने देणे..

*गप्प बसणारा समाज हा व्यसनाचा मूक साथीदार ठरतो.*

प्रशासन आणि पोलिसांची भूमिका — अत्यंत निर्णायक आहे !आज प्रशासन व पोलिसांकडून *कठोर* पण संवेदनशील कारवाईची अपेक्षा आहे. ड्रग पुरवठा साखळीवर कडक कारवाई करावी , कॉलेज परिसर, लॉज, हायवे भागांवर नियमित तपास, रात्रीची गस्त वाढविणे , मोठ्या कारवाईसोबत जनतेशी संवाद देखील साधावा. पालक–शाळा–पोलीस यांच्यात समन्वय आवश्यक आहे .प्रशासनाने देखील पिढी वाचवण्याचा दृष्टिकोन ठेवावा  ही लढाई: फक्त पोलिसांची नाही ,फक्त पालकांची नाही ही फक्त प्रशासनाची नाही.ही आपल्या सर्वांची लढाई आहे.आज आपण डोळे उघडे ठेवले, संवाद साधला, आणि ठाम भूमिका घेतली — तर उद्या आपली तरुण पिढी सुरक्षित हातात असेल.चला, उशीर होण्याआधी जागे होऊया.कारण एकदा हरवलेली पिढी परत येत नाही…डॉ स्वप्निल भालेकर नेत्रतज्ञ शिरूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button