राष्ट्रीयविशेष

१,१११११ सूर्यनमस्कारांचा अभूतपूर्व विक्रम; ज्ञानगंगा गुरुकुलचा प्रेरणादायी उपक्रम

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी १,१११११ सूर्यनमस्कारांचा अभूतपूर्व विक्रम साकारत योगसाधनेचे सामर्थ्य दाखवून दिले. २५ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सलग सूर्यनमस्कार घालत प्रत्येक विद्यार्थ्याने तब्बल १००० सूर्यनमस्कार पूर्ण केले.
गुरुकुलमधील विद्यार्थी दररोज एक तास नियमित योगसाधना करतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा या त्रिसूत्रीमुळेच विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले. नियमित सरावाच्या बळावरच १,१११११ सूर्यनमस्कारांचा हा विक्रम साध्य झाल्याचे गुरुकुल प्रशासनाने नमूद केले.
या विद्यार्थ्यांना गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे तसेच ज्ञानप्रबोधिनी, निगडी यांचे मार्गदर्शन लाभते. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिरूर-कारेगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर, गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, उपाध्यक्ष दिपक घावटे, सचिव साविताताई घावटे, खजिनदार सुधीर शिंदे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, प्राचार्य गौरव खुटाळ, प्रशासक शिशिर जगताप, मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, गुरुकुल प्रमुख जयश्री खनसे, योग शिक्षिका भाव्या  गौरव बाफना, उद्योजक प्रकाश बाफना यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, अनेक पालकांनीही उत्साहाने सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सनशाईन क्लबचे सदस्य डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर आणि डॉ.  संदीप कोकरे यांनी प्रत्येकी २५० सूर्यनमस्कार घालून उपस्थितांना प्रेरणा दिली.

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

शिरूरसारख्या ग्रामीण भागात सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या कालावधीत व्यक्तिमत्त्व घडवणारी शाळा सुरू झाल्याने भविष्यात सुसंस्कारित आणि आदर्श विद्यार्थी घडतील, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. नियमित सराव आणि शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीमुळेच हे अभूतपूर्व यश विद्यार्थ्यांना मिळाल्याचेही पालकांनी आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button