राष्ट्रीयविशेष

शिरूर तालुक्यात २ बिबटे जेरबंद

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभाग अलर्ट मोड वर आले असून विविध ठिकाणी बिबट्याला जे्रबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत.

 फाकटे ता. शिरूर येथील धनंजय एकनाथ थोरात यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट जेरबंद झाली. सदर बिबट्याचे वय अंदाजे ८ वर्षे असून तिला सुरक्षितरीत्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली आहे.

  • दरम्यान तालुक्यातील पूर्व भागातील इनामगाव (वाळूंज) परिसरातही वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट अडकली. या बिबट्याचे वय अंदाजे २ वर्षे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये असलेली भीती काही अंशी कमी झाली आहे.वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन सर्व आवश्यक खबरदारी घेत बिबट्यांना जेरबंद केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे तसेच बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

    पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button