
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट 24}भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
त्यांच्या या सन्मानामुळे शिरूर सह सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल तसेच कारागृह सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्रदान करण्यात येते.
यंदा देशातील एकूण ९८२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले दयानंद गावडे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गणवरे गावचे आहेत.
त्यांनी १९९६ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. मुंबई सह रायगड, सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. शिरूर येथेही त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना प्रभावी कामगिरी बजावली होती.
त्याच्या या गौरवास्पद निवडीची माहिती समजताच सहकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
