शिरूर ( डेली न्यूज पोस्ट -२४)
महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी ॲड . विलासराव पिराजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली .
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड . यशवंत खराडे, सचिव ॲड . प्रवीण नलावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड . कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरूर तालुका वकील संघटनेतर्फे जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर उद्योजक फक्कडराव काळे यांनीही जाधव यांचे अभिनंदन केले आहे.
नोटरी म्हणून काम करताना येणा-या विविध अडचणी दूर करणे व विविध कल्याणकारी कामे करण्याचा मानस जाधव यांनी व्यक्त केला.