राष्ट्रीय
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }: भक्तिभावाने पार पडलेल्या रामलिंग यात्रेनंतर मंदिर परिसरातील कचऱ्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले ते लहानगे शालेय विद्यार्थी. रामलिंग मंदिर परिसरात दोन दिवसांच्या यात्रेनंतर निर्माण झालेल्या कचऱ्याची साफसफाई करत जीवन विकास मंदिर विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश कृतीतून दिला.

काही विद्यार्थ्यांनी रस्ते झाडून स्वच्छ केले, तर काहींनी कचरा वेगळा करण्याची जबाबदारी सांभाळली.
स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक म्हणून कर्तव्य याची माहिती व्हावी या उद्देशाने मागील काही वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो.

