शैक्षणिक

गुणवत्ता संवर्धन अभियान सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षात चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवत्ता संवर्धन अभियान सन २०२४-२५ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय, शिरुर ता. शिरुर यांनी १००० या विद्यार्थी संख्या गटात सहभाग घेवून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे .
यासंदर्भात नुकत्याच बोरा कनिष्ठ महाविद्यालयाचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला .
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वनवे , प्रा. रतनकुमार ससाणे , डॉ . संतोष दंडवते , प्रा .नंदकुमार पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला .
प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल , सचिव नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते , उपप्राचार्य हरिदास जाधव यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button