Uncategorizedक्राईम
शिरूरमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरण सहा महिन्यांत ९.९४ लाखांचा गंडा; आरोपी फरार
शिरूर दिनांक ( टीम डेली न्यूज पोस्ट -२४) :
शिरूर शहरात तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीत एका इसमाने “जास्त पैसे मिळवून देतो” असा विश्वास बसवून तब्बल ९,९४,३२७ रुपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश शहाजी पवार (रा. स्टेट बँक कॉलनी, शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी अनिकेत भाऊसाहेब भुजबळ (रा. पत्ता माहीत नाही) याने मंगेश यांना “तू काही रकमेचे व्यवहार विविध कंपन्यांच्या खात्यावर कर, त्यातून तुला चांगला नफा मिळेल,” असे सांगत वेळोवेळी रक्कम मागितली.

मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा न देता उलट फिर्यादीची फसवणूक करून धमकावण्यात आले.
