Uncategorizedराष्ट्रीय

शिरूर शहराजवळ बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट्या ठार

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे अहिल्यानगर रस्त्यावर रस्त्यावर अज्ञात वाहनाने रात्री बिबट्यास ठोकरल्याने बिबट्या मृत्यूमुखी पडला.गेल्या काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव मोठया प्रमाणावर वाढला आहे.¯

मागील महिन्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिंपरखेड भागातील तीन जणांना मृत्यू पत्करावा लागला आहे.तर पंधरा दिवसांपूर्वी शहरातील नदीकाठचा भाग असणाऱ्या सुरज नगर सुशीला नगर तसेच अन्य परिसरात बिबट्या फिरत असताना लोकांना आढळून आला होता. त्या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात लावण्यात आला असून अण्णापूर परिसरात ही एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

आज { रविवार १६ नोव्हेंबर } रोजी शिरूर शहरा बाहेरून जाणा-या पुणे अहिल्यानगर महामार्गा बायपास वर रिला यन्स पंप जवळ रस्त्या ओलंडात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबटया मरण पावला. घटनास्थळी वनकर्मचारी पोहचले आहेत.

काही दिवसात शिरूर तालुक्यात बारा  बिबटे जेरबंद करण्यात आले असून एक बिबट्या ठार करण्यात आला तर एक शिरूर शहरा जवळील अण्णापूर गावातील ढग्या डोंगरावर मृतावस्थेत आढळून आला व आज अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मृत्युमुखी पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button