Uncategorized
शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल तर नगराध्यक्षपदा करिता ६ जण मैदानात
शिरूर : गेल्या काही वर्षांपासून गाव कारभारी वाट पाहत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या असून अनेक जणांनी पक्षाची उमेदवारी नाकारल्यावर अपक्ष म्हणून आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.तर काहीनी आपल्या मूळ पक्षानी उमेदवारी नाकारल्यावर दुसरा पक्षाच्या झेंडा हाती घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी १३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकूण उमेदवा्रीची संख्या २० इतकी झाली आहे. तर नगरध्यक्ष पदाकरिता ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस { अजित पवार } यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मागील टर्म मध्ये असलेल्या आठ नगरसेवकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. नगरसेवक अभिजीत पाचर्णे हे नगरसेवक पदाकरिता तर त्याच्या पत्नी ऐश्वर्या पाचर्णे या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करत आहे.तर भाजपाचा वतीने मागील टर्म मधील तीन नगरसेवकाना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस { शरद चंद्र पवार } पक्षाच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या उमदेवार यादीत मागील टर्म मधील दोन नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी या उमेदवारांना मिनतवारी करावी लागेल असे दिसते.
शिरूरचे राजकारण हे धारिवाल कुटुंबामध्ये केंद्रीत झालेले आहे. राज्यात आणि देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असो शिरूर शहरांमध्ये मात्र धारिवाल यांचीच निर्विवाद सत्ता राहिलेली आहे.
साहजिकच शिरूर शहराच्या राजकारणात निवडणुका पक्षीय पातळी ऐवजी स्थानिक आघाड्या द्वारे लढल्या गेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय हे नेहमीच धारीवाल यांच्या पॅनल सोबत राहिलेले आहे.
भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाने या स्थानिक आघाडी पुढे वेळोवेळी आव्हान उभे केले होते.
साहजिकच यंदाच्या निवडणुकीत उदयोगपती प्रकाश धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीच्या द्वारे निवडणूक लढवण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार फिल्डिंग लावून होते. धारिवाल यांच्या शिरुर विकास आघाडीची उमेदवारी म्हणजे विजया ची हमखास हमी असे
शिरूर शहराच्या राजकारणाच सूत्र मानलं जात. अशी राजकीय समीकरणे असताना शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुका आपल्या व्यवसायाचा व्याप वाढल्याने आपण आघाडीद्वारे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय भूकंप शिरूर शहरात झाला. त्याचबरोबर मागील अनेक निवडणुकीत सत्ताधारी आघाडी पुढे आव्हान उभे करणारे माजी नगरसेवक व लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनीही निवडणूक मैदानात उतरणार नसल्याचे जाहीर केले. त्यातच मागील पाच दशकावून अधिक काळात शिरूर च्या राजकारणात विविध राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे करणारे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने विरोधकांमध्ये एकी निर्माण करून निवडणूक लढविणारे उमेदवारांना बळ देणारे नेतृत्व हरपले गेले.साहजिकच या निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. या सर्व गोष्टींमुळे शहराच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
धरिवाल यांनी जाहीर केलेल्या भूमिके नंतर इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपला मोर्चा विविध राजकीय पक्षांच्या कडे वळविला.
केंद्रात व राज्यात एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकत्रित येऊन लढतील असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही राजकीय पक्षांचा सवता सुभा आढळला. महायुतीत बिघाडी झाली.
शिरूर शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष राहिलेल्या सुवर्णा लोळगे यांनी भाजपचे तिकीट घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच बरोबर माजी नगरसेविका रोहिनी बनकर यांनी धनुष्यबाण हाती घेऊन नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव यांच्या पत्नी नगरसेविका पूजा जाधव यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले आहे. मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी ही मनसेची साथ सोडत घड्याळ हाती बांधले आहे.माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी नगराध्यक्षपदाच्या करिता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना { शिंदे } पक्षाचे उमेदवार ही स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.साहजिकच महायुतीत बिघाडी झाली आहे.
दुसरीकडे बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर सावध झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समंजसपणे भूमिका घेत निवडणुका या एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला असून माजी आमदार अशोक पवार हे यासाठी सक्रिय झाले आहेत. काँग्रेस आय शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्ष महाविकास आघाडीच्या द्वारे एकत्रित आले आहे.
तिसरीकडे सत्ताधारी पक्ष व महाविकास आघाडीचा यांच्या दोघांच्याही विरोधात तिसऱ्या आघाडीच्या रूपाने जनता दल धर्मनिरपेक्ष बहुजन मुक्ती पार्टी त्याचबरोबर आम आदमी पक्ष व इतर पक्ष एकत्रित येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विशेषतः केंद्रात आणि राज्यात जनता दल धर्मनिरपेक्ष सत्ताधाऱ्यांबरोबर असतानाही शिरूर शहरात मात्र जनता दल तिसऱ्या आघाडीत असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय आहे.
अनेक माजी नगरसेवक स्वतः व काही आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
शिरूर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळाला व ज्ञानेश्वर माऊली कटके आमदार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून निवडणूक लढवलेले माजी आमदार अशोक पवार यांना पराभवाची चव चाखावी लागली.
कटके यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजप शिवसेना एकनाथ शिंदे व इतर मित्र पक्षांनी एक दिलाने काम केले. व महायुतीचा विजय झाला.
साहजिकच महायुतीच्या एकसंधतेमुळे विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीस सुकर बनली.
परंतु शिरूर नगरपरिषद निवडणुकी करता या दोन्ही पक्षात युती झाली नाही.शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार माऊली कटके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांच्याही नेतृत्वाचा कस या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीला पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मरगळ व निराशा आली आहे. शिरूर नगरपरिषद निवडणुकीत निवडणुकी मोठे यश प्राप्त करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने प्रयत्न होतील असे दिसते. धारीवाल यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयानंतर माजी आमदार अशोक पवार यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलेले होते. त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना एकत्रित करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिरूर नगरपरिषद निवडणूक माजी आमदार अशोक पवार यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची बनली आहे.
धारिवाल,धनक व पाचर्णे यांच्या सक्रिय सहभागाशिवाय होत असलेली शिरूर नगर परिषदेची निवडणूक ही कुणाचे राजकीय प्रतिष्ठा उंचावणार व कोणाचे राजकीय अस्तित्व क्षीण करणार हे येथे पंधरा दिवसात स्पष्ट होईल. या निवडणुकीत शिरूर शहराचे राजकारण जे स्थानिक आघाड्यांभोवती सातत्याने राहिलं ते प्रथमच राजकीय पक्षांच्या भोवती केंद्रित झाले असून शिरूरच्या राजकारणातील ही गेमचेंजर घटना आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता सुद्धा तिन्ही पक्षाने आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत महाविकास आघाडीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अलका सुरेश खांडरे या मैदानात आहेत तर भारतीय जनता पक्षात झालेल्या विविध राजकीय घडामोडीनंतर माजी नगराध्यक्ष सुवर्ण राजेंद्र लोळगे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक अभिजित पाचर्णे यांच्या पत्नी ऐश्वर्या पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना ( शिंदे ) यांच्या वतीने माजी नगरसेविका रोहिणी बनकर मैदानात आहे.
मागील टर्म मध्ये नगराध्यक्ष पद भूषवलेल्या माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे याही निवडणूक मैदानात आहे. यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणुक पंचरंगी होईल असे दिसते.
यापूर्वी थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत एका वेळेस भाजप व दोन वेळेस शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.
चौकट
शिरूर नगरपरिषदेसाठी एकूण प्रभाग १२ असून त्यासाठी इतके उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदाकरिता ५ हून अधिक उमेदवार रिंगणात आहे.
_____________________________
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रभाग निहाय उमेदवार –
प्रभाग क्रमांक एक अ -संगीता मल्लाव व ब -निलेश गाडेकर
क्रमांक दोन: अ- अंजली थोरात ब – एजाज बागवान
प्रभाग क्रमांक तीन – अ -सुनील जाधव व ब- मनीषा कालेवार
प्रभाग क्रमांक ४ – अ – पूजा जाधव
ब – अर्षद शेख
प्रभाग क्रमांक -५ अ -प्रणिता जोशी, ब – अभिजित पाचर्णे
प्रभाग क्रमांक ६ : अ -रिता गुजर व ब – दिनेश मांडगे
प्रभाग क्रमांक ७ : अ – अचल फलके
ब – सुरेखा शितोळे
प्रभाग क्रमांक ८ : अ – पल्लवी शहा
ब – प्रदीप बोरा
प्रभाग क्रमांक ९ – अ – विनोद भालेराव, ब – सविता राजापुरे
प्रभाग -१० अ – स्वाती साठे, ब – रंजन झांबरे
प्रभाग क्रमांक ११ अ कुलजूप काळे व ब तुषार वेताळ
प्रभाग क्रमांक १२ :- अ – अविनाश घोगरे व ब – कल्पना थोरात
नगराध्यक्ष पद उमेदवार – ऐश्वर्या अभिजित पाचर्णे
————————————————
राष्ट्रवादी काँग्रेस { शरद चंद्र पवार ) प्रभाग निहाय उमेदवार –
प्रभाग क्रमांक एक अ -नीलम धाडीवाल व ब -प्रितेश कोठारी
क्रमांक दोन: अ-स्वप्ननाली जामदार ब – मुजफर कुरेशी
प्रभाग क्रमांक तीन – अ -हाफिज बागवान व ब रेखा लुनिया
प्रभाग क्रमांक ४ – अ – डॉ. सुनीता पोटे,ब – अमोल चव्हाण
प्रभाग क्रमांक -५ अ -, प्रियंका बंडगर ब – आशिष शिंदे
प्रभाग क्रमांक ६ : अ – ज्योती लोखंडे व ब – योगीराज महाडिक
प्रभाग क्रमांक ७ : अ – परशुराम मचाले
ब – सौ.प्रियंका करंजुले
प्रभाग क्रमांक ८ : अ – चारुशीला गणेश कोळपकर
ब – मितेश गादिया
प्रभाग क्रमांक ९ – अ – रवि ढोबळे ब – मधू शिशुपाल
प्रभाग -१० अ – माया गायकवाड ब – संजय देशमुख
प्रभाग क्रमांक ११ अ वैष्णवी धूळे व ब साजिद खान
प्रभाग क्रमांक १२ :- अ – अशोक कदम व ब – नंदा जाधव
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – अलका सुरेश खांडरे
_____________________________
भारतीय जनता पक्ष प्रभाग निहाय उमेदवारी यादी –
नगराध्यक्ष उमेदवार-सुवर्णा राजेंद्र लोळगे
शिरुर प्रभागनिहाय उमेदवार
*प्रभाग क्रमांक १ -*
१) संगीता देविदास वेताळ
२) अनिल एकनाथ गायकवाड
*प्रभाग क्रमांक २ -*
१) वैष्णव अविनाश खांडरे
२) पुरस्कृत…..
*प्रभाग क्रमांक ३ -*
१) केशव संपत लोखंडे
२) शितल अविनाश जाधव
*प्रभाग क्रमांक ४ -*
१) नितिन मच्छींद्र पाचर्णे
२) ॲड वैशाली प्रमोद गायकवाड
*प्रभाग क्रमांक ५ -*
५) संतोष प्रभाकर थेऊरकर
६) सुनिता आनंद भुजबळ
*प्रभाग क्रमांक ६ -*
१) गणेश शिवराम पाचर्णे
२) सुनिता पोपट कुरंदळे
*प्रभाग क्रमांक ७ -*
१)पुजा पुष्पराज पोटावळे
२) सागर त्रिंबक नरवडे
*प्रभाग क्रमांक ८ -*
१) पुजा तुषार जांभळे
२) केतन दीलीप बोरा
*प्रभाग क्रमांक ९ -*
१) —
२) शारदा राजु गव्हाणे
*प्रभाग क्रमांक १० -*
१) रेश्मा दादाभाऊ लोखंडे
२) निलेश संजय पवार
*प्रभाग क्रमांक ११ -*
१) अमित संपतराव कर्डीले
२)स्विटी दत्तात्रय शिंदे .
*प्रभाग क्रमांक १२ -*
१) उमेश शेळके
२) रींकु राजेश जगताप
——-=====———=——=—————_________
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित आघाडीच्या वतीने खालील उमदेवारयांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली.प्रभाग – १ ब रवि बाळशिराम लेंडे,प्रभाग -२ ब संदीप रघुनाथ कडेकर,प्रभाग – ३ अॅड. आदित्य दिलीप मैड,प्रभाग -३ ब आयेशा कलिम सय्यद,प्रभाग ४ ब उमेश सिताराम भोसले,प्रभाग- ८ ब महिबूब जैनुद्दीन सय्यद,प्रभाग क्रमांक १२ ब -सविता अनिल बांडे