Uncategorizedअपघात

कारच्या अपघातात एक जण मृत्यमुखी

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
आंधळगाव ता. शिरूर येथे मध्यरात्री झालेल्या  अपघातात एक जण मरण पावले.बाळासाहेब रामभाऊ नाईकवाडी (वय ५६, रा. राधा अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भरधाव वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटल्याने झाला.

 पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार याबाबत दिपक सखाराम सोनवणे (वय ३५, रा. राजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी यश बाळासाहेब नाईकवाडी (रा. राधा अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश नाईकवाडी हा आपल्या ताब्यातील हुंडाई कंपनीची एम. एच. 11 सी क्यू -7050 ही कार भरधाव वेगात व अविचाराने चालवत असताना समोर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या धडकेत गाडीत प्रवास करणारे बाळासाहेब रामभाऊ नाईकवाडी (वय ५६, रा. राधा अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६७/२०२५ भां.न्या.स.का.क. १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार खबाले करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button