महाराष्ट्रविशेष

स्वच्छ सुंदर व हरित शिरूर साठी लोकसहभाग महत्वाचा

सह्याद्री देवराई शिरूर येथे वृक्षारोपण करताना मुख्याधिकारी प्रीतम पाटील.

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )स्वच्छ सुंदर हरित शिरूर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे याकरिता लोकसहभाग महत्त्वाचे असल्याचे शिरूर चे मुख्याधिकारी प्रीतम पाटील म्हणाले.

सिने अभिनेते व वृक्ष लागवड अभियान चालविणारे सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त व शिरूर नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियान-6 अंतर्गत नगरपरिषद व सह्याद्री देवराई शिरूर यांच्या वतीने जुन्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील देवराई डोंगरावर चिंच,जांभूळ,आवळा अश्या 200 हुन अधिक देशी झाडे लावण्यात आली.
शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम -24 चा वतीने हार्दिक शुभेच्छा.

शिरूर येथील हॉटेल आंबिका शेजारील डोंगरावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई शिरूर च्या वतीने मागील चार वर्षाहून अधिक काळापासून विविध प्रकारची देशी झाडे चिंच,वड,जांभूळ,आंबे यासह विविध झाडे लोक सहभागातून लावण्यात आली आहे.
सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व माझी वसुंधरा अंतर्गत 1000 हून अधिक वृक्ष लावण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दोनशे वृक्ष लावण्यात आले.
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, सह्याद्री देवराई शिरूरचे महिबूब सय्यद, रवींद्र सानप, प्रा. चंद्रकांत धापटे,राहुल निकुंभ, रवी लेंडे,
स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, कर निरिक्षक माधव गाजरे, सहाय्य्क कर निरीक्षक दीपक कोल्हे, नगररचना सहाय्यक पंकज काकड, नगर अभियंता समाधान मुंगसे, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे, लेखापाल अंकुश इचके, अंतर्गत लेखापरिक्षक दत्तात्रय टोपे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, विद्युत अभियंता तेजस शिंदे, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक शितल काळे, स्थापत्य अभियंता शामली लाड, प्रकल्प सहाय्यक विजय आंधळे, भगवान दळवी, भूषण कडेकर, चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, मिठ्ठू गावडे, शहर समन्वयक प्राची वाखारे, श् काळूराम आसवले, स्वच्छता मुकादम  सुरज चव्हाण, किरण जाधव, गणेश शेंडगे, महेश लोळगे, विजय गायकवाड, स्वप्नील तरटे, सागर बडगुजर, गौरव कुलथे, नीता जाधव, सोनाली रायबोले,आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी मोबाईल वरून अभिनेते सयाजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शिरूर नगर परिषदेच्या वृक्षारोपण मोहिमेचे ब्रँड अँबेसेडर होण्याबाबतही शिंदे यांना विनंती केली.
महिबूब सय्यद यांनी सह्याद्री देवराई शिरूर च्या वतीने शिरूर शहर हरित करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे सांगून याकरिता शहरातील डोंगरांवर वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन लोक सहभागाद्वारे करण्यात येत आहे. पुण्या अहिल्यानगर रस्त्यावरील सह्याद्री देवराई येथे मोठ्या प्रमाणावर देशी फळझाडे लावण्यात येत आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
स्वागत प्राची वाखारे यांनी तर
सुत्रसंचालन रवींद्र सानप यांनी केले.आभार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button