Uncategorizedक्राईम

टेम्पोतून अज्ञात चोरट्यांनी ५३,५३२रु . किंमतीचा ४६४ किलो पॉपकॉर्नचा माल केला लंपास

शिरूर दिनांक ( वार्ताहर )बाबुरावनगर येथील कोळपे हॉस्पिटल शेजारी उभ्या असलेल्या टेम्पोतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५३,५३२रु . किंमतीचा ४६४ किलो पॉपकॉर्नचा माल लंपास केला.याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दत्तात्रय भाउसाहेब देवकर (३१, रा. चांडोली, ता. खेड) तक्रार दिली आहे . देवकर यांचा अशोक लेयलँड टेम्पो (क्रमांक MH-14 JP-6786) ६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता पार्क करून ठेवला होता. सकाळी ५.१० वाजता पाहणी केली असता १५ सिलबंद गोण्या (प्रत्येकी ३० किलो) व १४ किलो वजनाचा पॉपकॉर्न बॉक्स असा एकूण ४६४ किलो माल चोरीला गेल्याचे उघड झाले.

चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स गुन्हा नोंदवून पोलीस हवालदार भगत तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button