विशेष

ज्यांचे कोणी नाही, त्याच्या आधार होऊया,स्नेह अन विश्वासाचा धागा बांधून रक्षाबंधन साजरे करू या

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
ज्यांचे कोणी नाही
त्याच्या आधार होऊ या.
स्नेह अन विश्वासाचा धागा
बांधून रक्षाबंधन साजरे करूया.
या भावनेने गेल्या 16 वर्षापासुन शिरूर येथील शासकीय विशेष मुलीच्या ( कर्मोलदया) या संस्थेत भूमिपुत्र प्रतिष्ठानचा वतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात विशेष मुलीं समवेत रक्षाबंधन साजरे करून राख्या बांधल्या जातात व आम्ही सर्व जण भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याची ग्वाही देतात.
भुमीपुत्र प्रतिष्ठानचा वतीने
कर्मोलदया संस्थेत रक्षाबंधनाचा भाऊ-बहिणींच्या नात्याचा सण १६ वर्षांपासून साजरा केला जातो.
कार्यक्रमास शिवजयंती उत्सव समिती शिरूरचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, आबीद शेख, मनःशांती छात्रालयाचे विनय सपकाळ, किरण बनकर, आरपीआयचे अध्यक्ष नीलेश जाधव, हाजी मुश्ताक शेख, हाफिज बागवान, अविनाश जाधव, सागर नरवडे, संजय काळे, आसिफ शेख, सिद्धार्थ चाबुकस्वार, संतोष शितोळे, वसीम सय्यद, संपत दसगुडे, प्रज्वल ढेरे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गेली 16 वर्षापासुन राबण्यात येत असलेल्या हा उपक्रम कौतुकास्पद असुन संस्थेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
प्रस्ताविक भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केले. योगेश जामदार यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर याज्ञा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button