विशेषशैक्षणिक

रक्षाबंधन निमित्त शिरूरच्या विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळेकडून सीमेवरच्या जवानांकरिता 1001 राख्या व शुभेच्छा

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)सीमेवरती पहारा त्यांचा,ऊन वारा झेलत, नित्य दिनकरतात देशाचे संरक्षण,त्याग,समर्पण अन देशसेवात्यांची आहे अनमोल,कृतज्ञतेने करूया त्यांना वंदन.बांधू एक कृतज्ञतेची ही राखी.

oplus_131074

देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिका प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणून येथील विद्याधाम प्रशाला प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 1000 हून अधिक राख्या सीमेवरच्या जवानांना शुभ संदेशासह पाठविल्या. त्याचबरोबर सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या परिसरातील सैनिकांचे औक्षण करत व पेढे भरून रक्षाबंधन साजरे केले.

विद्याधाम प्रशालेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विद्याधाम प्रशाला शालेय समिती शिक्रापूरचे अध्यक्ष शिरीष बरमेचा, शालेय
प्रशासकीय अधिकारी देशपांडे, प्रवीण गायकवाड,
विद्याधाम प्रशाला प्राथमिकच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, आरएमडी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारू, माजी सैनिका सुमित कोकाटे
, ज्ञानेश्वर यादव,संतोष कुरंदळे,
मारुती डेरे,दादाभाऊ साळुंके,बापू धरणे
,बाळू खिलारी, भानुदास शेळके, जयसिंग भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भारत पाकिस्तान मध्ये झालेले कारगिल युद्ध, सर्जिकल स्ट्राईक व ऑपरेशन सिंदूर यासंदर्भातील चित्रफिती दाखवून भारतीय सैनिकांच्या पराक्रम शौर्य यांची माहिती देण्यात आली. यावेळी भारत माता कि जय, जय जवान जय किसानच्या ही जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी केले. दरवर्षी नियमितपणे प्रशालेतील विद्यार्थी सीमेवरच्या जवानांसाठी राख्या व सोबत संदेश पाठवतात. या राख्या विद्यार्थी स्वतः बनवतात. सीमेवर असणाऱ्या जवानांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो.
कारगिल युद्धात सहभागी असणारे व विद्याधाम प्रशालेचे माजी विद्यार्थी दादाभाऊ साळुंखे म्हणाले की कारगिलच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढता आले. इतरांचे फौंजीचे जीवन वेगळे असते. सैनिक म्हणून देशसेवा करताना याचा सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थिनींनी शाळेत बोल वून रक्षाबंधन निमित्त राख्या बांधल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रुहानी पिंपरकर, अभिज्ञा अडसूळ
, मोरबाळे दिया, गौरी दापकेकर,नाईकरे तन्वी या विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती कृतज्ञता भाषणाद्वारे व्यक्त केली.
याप्रसंगी सूत्रसंचालन चैताली दिवटे यांनी केले. सैनिकांना पाठविलेल्या पत्राचे वाचन अर्चना घोगरे यांनी केले तर आभार रूपाली करंजकर यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button