क्राईम

आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे रक्षा बंधन निमित्त अनोखे आंदोलन

शिरुर दिनांक ( वार्ताहर )आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी रक्षा बंधन निमित्त अनोखे आंदोलन शिरूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना राखी बांधून केले.
मागील १ वर्षांपासून फरारी असणाऱ्या अभय व प्रविण या चोरडिया कुटुंबातील आरोपींच्या अटकेची ओवाळणी मागण्यात आली.
याबाबत माहिती देताना ॲड .सुभाष जैन यांनी सांगितले की आनंद पतसंस्थेचे चेअरमन अभय चोरडिया यांनी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून २०१३ पासून अनियमित मार्गाने आपल्या ३ भागीदारी फर्म १)मेघहंस ट्रेडिंग कंपनी, २) मेघहंस सेल्स आणि ३) मेघराज हंसराज अँड सन्स् यांच्या नावाने रू.२७ कोटींची बेकायदेशीर पद्धतीने कर्जरूपाने उचल केली. आणि मार्च २०२३ पासून पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत करण्यासाठी नकार द्यायला सुरुवात केली. ही तक्रार आल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकार विभाग शिरूर यांनी कारवाई सुरू केली. त्याअंतर्गत ०९/०७/२४ रोजी चोरडिया कुटुंबातील ९ जण आणि अन्य ५ अशा १४ लोकांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली.
ठेवीदारांनी सतत पाठपुरावा करून सुद्धा आख्ख्या वर्षांत शिरूर पोलिसांना एकही आरोपी हाती लागला नाही.
या प्रकारामुळे त्रस्त झालेले ठेवीदार शेवटी कंटाळून १२ऑगस्ट २०२५ पासून पोलीस स्टेशनसमोर आरोपी सापडत नाहीत तोवर बेमुदत उपोषणाच्या तयारीत होते. .बेमुदत उपोषणाच्या सूचनेची राखी शिरूर पोलिसांना बांधून एफआयआर मधील १ वर्षांपासून फरारी असणाऱ्या अभय व प्रविण या चोरडिया कुटुंबातील आरोपींच्या अटकेची ओवाळणी मागण्यात आल्याचे जैन
यांनी सांगितले .
दरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल व ठेवीदारांना दिलासा मिळेल . १२ ऑगस्ट पासून होणारे ठेवीदारांचे उपोषण पोलिसांनी विनंती केल्यामुळे स्थगित करण्यात आले असल्याची ठेवीदारांनी सांगितले.
यावेळी ॲड .सुभाष जैन, सतिश छाजेड, रामदास सरड, ललित सुराणा, योगिता लोढा, सचिन लोढा, फईम सय्यद,देवल शाह, निलेश मुथा, मंगल बाफना, निर्मला चाबुकस्वार, श्रीकांत चाबुकस्वार, राजेंद्र दुगड, रामभाऊ सरोदे, योगेश चंडालिया, रवी पुजारी, लता जाधव, वर्षा सुराणा, मनिषा वारे , विद्याधर कुलकर्णी, रत्नमाला फिरोदिया,आदी उपस्थित होते .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button