राष्ट्रीयविशेष

क्रांती दिनानिमित्त लोकजागृती संघटनेचा वतीने शिरूर येथे अभिवादन व रक्तदान शिबीर संपन्न.

हुतात्मा स्मारक शिरूर येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोक जागृती संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शिरूर येथील हुतात्मा स्मारक लोकजागृती संघटना सह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले.
हुतात्मा स्मारकावर सकाळी लोक जागृती संघटनेचे ॲड.ओमप्रकाश सतीजा, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष नसीम खान, राजेंद्र क्षीरसागर,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, प्रभाकर डेरे मामा, माजी सभापती प्रदीप बारवकर, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, रमणलाल भंडारी, अभिनेते व दिग्दर्शक दीपक घारू, मुख्याध्यापक दत्तात्रेय शिंदे ,प्राचार्य समीर ओंकार, नोटरी रवींद्र खांडरे, मोहम्मद हुसेन पटेल, प्रा. चंद्रकांत धापटे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुन्ना शेख, खुशाल गाडे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, प्रा. दीपक गायकवाड , जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना,नीलेश नहार ,वसंत बेंद्रे, अजिमभाई सय्यद, संजय बांडे, संदीप भोसले, आप्पा वर्पे , विलास गोसावी, डॉ. सोळुंके, नीलेश नहार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र धनक यांनी सांगितले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेले ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सन 1985   पासून लोक जागृती संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येते. त्याचबरोबर 33 वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
द्वेषा ने माथी भडकवली जात असताना एकमेकांशी सोहार्दपूर्ण राहिले पाहिजे. निर्भयपणे जगण्याचा संकल्प करावा. चुकीला चूक म्हणण्याचे सामर्थ्य सर्वांमध्ये यावे  असेही धनक म्हणाले. यावेळी प्रास्ताविक ओम प्रकाश सतीश यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले.

ऑगस्ट क्रांती दिन व आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात अधिक जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर स्थळी गौतम मुनिजी महाराज, चेतनजी महाराज, महाराष्ट्र जनता दल धर्मनिरपेक्षेचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, तहसीलदार डॉ. सुनील शेळके माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, पोपटलाल ओस्तवाल, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख मुजफ्फर कुरेशी, सुकुमार बोरा,योगेश जामदार, आदींनी भेट दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button