राष्ट्रीयविशेष

देशभक्तीपर समूहगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देश प्रेम, देशभक्ती निर्माण होण्यास मदत : किशोरराजे निंबाळकर

डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) आंतरशालेय देशभक्तीपर स्पर्धेत डेक्कन स्कूल इंग्लिश मीडियम शिरूर यांचा प्रथम क्रमांक आला.
शिरूर नगरपरिषद,समर्थ सेवा मंडळ, शिरूर, आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन शिरूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन शिरूर येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर व महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे माजी अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार, माजी प्राचार्य सदाशिव सोवनी, मराठी साहित्य परिषद शाखा शिरूरच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. क्रांती पैठणकर,अविष्कार फाउंडेशनचे प्रा.विलास आंबेकर, माजी मुख्याध्यापक व्हि. डी. कुलकर्णी,

दिवटे पाटील पब्लिक स्कूल सुपा, ता. पारनेर

नाना पोटे, पसायदान संस्थेचे वैभव मराठे, डॉ. नूतन क्षीरसागर, प्रा. चंद्रकांत धापटे, डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, बालाजी विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर राजे निंबाळकर म्हणाले की देशभक्तीपर समूहगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देश प्रेम, देशभक्ती निर्माण होण्यास मदत होते. देशभक्तीपर समूह गीते आपणास प्रेरणा देतात. भारताच्या स्वतंत्र्यलढ्याच्या वेळेस विविध गीतांनी स्वातंत्र्याची व देशभक्तीची भावना प्रबळ केली. ताल,सूर, लय याची एकत्रित गुंफण समूहगीतातून साधली जाते . शिरूर शहर विद्येचे माहेरघर असून प्रशासनातील विविध अधिकारी, व्यावसायिक, ध्येयवादी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते व नेते शिरूर शहरात घडले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक करून अधिकाधिक शाळांना यात सामावून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या काळातील पिढीने त्याग, बलिदान केले. देशासाठी दिलेल्या बलिदान व त्यागाची माहिती सध्या च्या पिढीला असणे आवश्यक आहे. देशभक्तीपर समूहगीतामुळे समाजाला स्फूर्ती मिळून चैतन्य निर्माण होते. यातून ऊर्जा व प्रेरणा मिळते असे गावडे म्हणाले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, द्वितीय क्रमांक- पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरूर, तृतीय क्रमांक – बालाजी विश्वविद्यालय शिरूर
उत्तेजनार्थ क्रमांक – शिरूर नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक -1, शिरूर नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक -5,
दिवटे पाटील पब्लिक स्कूल सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, आर एम डी प्रशाला शिरूर या शाळांचा आला.

माजी प्राचार्य सोवनी, ॲड . सुभाष पवार , आदींचीही मनोगते यावेळी झाली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध गायक हरिभाऊ मेहंदरकर व डॉ. शिल्पा घोडे यांनी केले
स्वागत प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. सतीश धुमाळ यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना निर्माण व्हावी या हेतूने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून शिरूर शहरात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी तर आभार प्रा. विलास आंबेकर यांनी मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button