विशेष

व्यवसायिक संतोष थेऊरकर यांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशच्या खर्चाला फाटा देत 100 गरजू कुटुंबास दिले धान्याचे किट


शिरूर दिनांक ( वार्ताहर )
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खर्चाला फाटा देत व्यावसायिक संतोष थेऊरकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील 100 गरजूना धान्य वाटप करण्यात आले.
शिवरत्न प्रतिष्ठान व संतोष थेऊरकर मित्र परिवार यांच्या वतीने बालाजी एम्पायर शिवाजीनगर गोलेगाव रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संतोष थेऊरकर म्हणाले की आयुष्यात जिद्द व प्रामाणिकपणा याच्या द्वारे व्यसायात यश मिळवले. ज्या समाजातून आपण आलो त्या समाजातील गरजवंताना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे.
यापूर्वी शिवरत्न प्रतिष्ठान व संतोष थेऊरकर मित्र परिवार यांच्या वतीने समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहे. आगामी काळात ही व्यवसाय उद्योग करीत असताना समाजातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे थेऊरकर म्हणाले.
यावेळी भाजपचे तालुकध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक अशोक पवार, ॲड . अनिल वाखारे , तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ फरगडे ,पांडुरंग कारखिले, मूलचंद सुराणा , मदनशेठ पिपाडा , आदी उपस्थित होते .
याप्रसंगी स्टेट बँक कॉलनी , विठ्ठल नगर , जोशीवाडी, गोलेगाव रोड , तर्डोबाचीवाडी , मोठी तालिम मित्र परिवार या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते .
स्टेट बँक कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने माजी मुख्याध्यापक संजय जी लुटे यांच्यासह योगेश भैय्या पवार , डॉ .अमित गायकवाड , शहाणे मित्र परिवार , हर्षद देसाई यांनी शुभेच्छा दिल्या
तर विठ्ठलनगर मित्र मंडळाच्या वतीने सी . ए . विशाल झवारे व दादा भुजबळ प्रसिद्ध बांधकाम दळवी व आढाव सर , आशिष शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच जोशीवाडी येथील पै. राजू भोसले, सारोळकर साहेब, प्रमोद गायकवाड , वसीम शेख , गणेश गांगड, पै अविनाश ढवळे , निखिल आढाव यांनी शुभेच्छा दिल्या .

गोलेगाव रोड येथील अनिल अंभोरे ,अक्षय गायकवाड , सुनील शिंदे , पडोळे साहेब , कळमकर मेजर , पोळ साहेब, ढवळे साहेब , इ उपस्थित होते.
यावेळी स्वागत नवनाथ मोहिते यांनी तर सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले आभार संतोष थेऊरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button