राष्ट्रीय

२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट  टीम- 24}ऑनलाइन औषध विक्रीला विरोध दर्शवत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या (AIOCD) वतीने २०मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्री बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 12 लाखाहून अधिक विक्रेते यात सहभागी होणार आहेत. यास महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

ऑनलाइन फार्मसीमार्फत होत असलेल्या औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून, रुग्णांच्या आरोग्याशीही गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने ई-पोर्टल आणि ऑनलाइन औषध विक्री संदर्भातील नियमांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने शिरूर तहसीलदारांना निवेदन देत बंदबाबत माहिती दिली.माजी जिल्हाध्यक्ष सुशीलभाई शहा, माजी तालुकाध्यक्ष बाबाजी गलांडे, शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अजित ढमढेरे, सचिव सचिन गाडे, चौथमल कोठारी, पुष्कराज कोळपकर, दीपक तातेड, अतुल शेवाळे, प्रकाश येणारे, हनुमंत गाडे आदी उपस्थित असल्याची माहिती बाबाजी गलांडे यांनी दिली.

 या निवेदनात २०  मे रोजी होणाऱ्या बंदमध्ये पुणे जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आवश्यक ते सहकार्य करतील, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप पारख आणि सचिव  अनिल बेलकर यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.शिरूर तालुक्यात अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी  अष्टविनायक मेडिकल वेदांता हॉस्पिटल,वेदांता मेडिकल, वेदांता हॉस्पिटल,रुबी मेडिकल माणिकचंद हॉस्पिटल, श्री.गणेश मेडिकल ,व्हीएमएच मेडिकल, विघ्नहर्ता हॉस्पिटल,ओम साई मेडिकल, वळसंगे हॉस्पिटल हे चालू ठेवण्यात आली असल्याचे गलांडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button