Uncategorizedविशेष
शिरूर शहरात देखावे पाहण्यासाठी शिरूरकरांची गर्दी
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )शिरूर परिसरातील अनेक गणेश मंडळांनी देखावा ऐवजी सामाजिक उपक्रम राबविणार भर दिला असून काही मंडळनी पौराणिक देखावे सादर केले आहेत.

शहरातील रस्त्यावर देखावे पाहण्यासाठी गर्दी होवू लागली आहे.
हलते आणि भव्य देखावे सादर करण्याची परंपरा असणा-या शहरातील श्री. रसिकलाल धारीवाल गणेश मित्र मंडळ आडत बाजार गणेश मंडळाने भगवान श्री.कृष्णाचा जीवनावरील भव्य हलत्या देखावा सादर केला आहे.

श्री.कृष्णाची भव्य मुर्ती देखाव्याचे आकर्षण आहे . मंडळाचे मार्गदर्शक प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल असून अध्यक्ष आशिष दुगड आहेत. हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
शहरातील श्रीमंत हलवाई चौक गणेश मंडळ ट्रस्ट यांचे उत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन यंदाचा वर्षी भव्य असा ”गणेश महाल ”हा देखावा सादर केला आहे. या मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्ष निमित्त विविधन

सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच बरोबर आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी ,रक्तदान शिबीर व महिलांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अशोक काळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
कापड बाजार गणेश मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी ‘श्रीदत्त जन्म’ हा भव्य हलता देखावा साजरा करण्यात आला आहे. त्याचे यंदा 98 वे वर्ष असून धीरज संघवी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळ गोपाळ वस्ती यांनी भव्य असे ‘ वेल्लूर येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या ‘देखावा सादर केला आहे. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून नीलेश पवार मंडळाचे अध्यक्ष आहेत.
श्री .गोपाळ मोठी तालीम गणेश मित्र मंडळ गोपाळ वस्ती यांनी यंदाचा वर्षी “स्वामी समर्थ ” हा देखावा सादर केला आहे.
मुंबई बाजार येथे हनुमान मित्र मंडळ व महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ यांनी एकत्रित येऊन ‘केदारेश्वर मंदिर ‘हा भव्य देखावा सादर केला आहे.
आखिल रामआळी गणेश मित्रमंडळाने गणेशा भोवती आकर्षक अशी सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर आहेत तर मंडळाचे व्यवस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर आहेत.रक्तदान शिबीराचे ही मंडळाने आयोजन केले होते.


मुंजोबा गणेश मित्र मंडळ भाजीबाजार आझाद हिंद गणेश मित्रमंडळ सुभाष चौक याठिकाणी ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी यंदाचा वर्षी विविध सामजिक उपक्रमाचे आयोजन केले असून गडकोट किल्ले असा देखावा सादर केला आहे. रक्तदान शिबिर ही घेण्यात आले. बाळासाहेब झाडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
स्टेट बँक कॉलनी गणेश मित्र मंडळ यांनी ही गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या मंडळाची गणेशमूर्ती लक्षवेधी आहे. परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .


कुंभार आळी गणेश मित्र मंडळ , छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी ,त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ रेव्हन्यू कॉलनी, अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ , सरदार पेठ गणेश मित्र मंडळ सरदार पेठ , शिरूर नगर परिषद कामगार गणेश मित्र मंडळ , याठिकाणी ही गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . शहरातील अनेक गणेशमंडळाने मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यास मोठा प्रतिसाद भाविकांनी दिला.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पुणे नगर रस्त्यावरील बो-हा डे मळा येथील सामाजिक संस्थेत ही गणेशोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ऑपरेशन सिंदूर हा देखावा संस्थेतील मुलांनी तयार केला होता अशी माहिती विनय सपकाळ यांनी दिली.
येथील डेक्कन एज्युकेशन स्कूल बाबुराव नगर येथे पंढरीची वारी हा देखावा सादर करण्यात आला असल्याचे प्राचार्य समीर ओंकार यांनी सांगितले.