Uncategorized

संपदा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. राजेराम प्रभू घावटे.

 

शिरूर( डेली न्यूज पोस्ट टीम-24)शिरूर तालुक्यातील राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रा.डॉ. राजेराम  प्रभू घावटे (सर) यांची बिनविरोध निवड झाली. संपदा पतसंस्था हि शिरूर तालुक्यात नोंदणीकृत पत्तसंस्था असून राज्य कार्यक्षेत्र असलेली एकमेव पतसंस्था आहे. संस्थेचे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात १५ शाखांच्या माध्यमातून कामकाज चालू असून संस्थेकडे १०२ कोटी रुपयांच्या ठेवी असून ७१ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेच्या शिरूर, शिक्रापूर, न्हावरे, पिंपरखेड, या शाखांना स्वः मालकीच्या इमारती आहे. ५१ कोटी रुपयांची गुंतवणूक व २५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज ही संस्थेची बलस्थाने असून भविष्यात सर्व शाखांच्या जागा स्वः मालकीच्या करणे, सुरक्षित व जलद गतीने कर्ज वितरण धोरण राबविणे, सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याबरोबर ग्राहकांना जलद व विश्वासपूर्ण सेवा देणे, याचबरोबर संपदा पतसंस्थेचे नाव राज्य पातळीवर प्रथम १० संस्थांच्या यादीत नेण्याचा संकल्प नवनिर्वाचित चेअरमन डॉ. राजेराम घावटे यांनी व्यक्त केला.

सदर प्रसंगी सहाय्यक निबंध कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री. दिपक वराळ यांनी  अधिकारी म्हणून काम पाहिले तर निवडी प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री माधव गोरडे, अमित गव्हाणे, पांडुरंग कारखिले, इंद्रभान गायकवाड, सदाशिव पाबळे, रामदास पाचंगे, लिलाबाई थोरात, सुनीता गोरडे तसेच संस्थेचे माजी चेअरमन श्री. प्रभाकर डेरे व ज्ञानदेव गव्हाणे उपस्थित होते, संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ.प्रा. राजेराम घावटे यांनी श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधून संपदा पतसंस्थेने छपाई केलेल्या श्री गणेश-आरती संग्रहाचे प्रकाशन केले. कार्यकारी संचालक श्री संपतराव वाळूज यांनी स्वागत केले तर उपकार्यकारी अधिकारी सुभाष औटी यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button