विशेष
शिक्षक दिनानिमित्त श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार जाहीर
प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, मुख्याध्यापिका अश्विनी घारू, शिक्षक दत्तात्रेय शिंदे, मनीषा चौधरी आदी पुरस्काराचे मानकरी

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिक्षक दिना निमित्त व श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ शिरूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दिनांक ४ संप्टेबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता डेक्कन इंग्लिश स्कूल बाबुराव नगर शिरूर येथे ४ शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य व शास्त्रज्ञ डॉ. के.सी.मोहिते
रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी दीपक घारू, रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल येथील शिक्षक दत्तात्रय बंडू शिंदे, बीकेसी प्री प्रायमरी स्कूल मुक्ताईनगर येथील मनीषा चौधरी, या शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे .
कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. दीपक गायकवाड, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,प्राचार्य डॉ. समीर ओंकार, प्रा. चंद्रकांत धापटे, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यंदाचा वर्षी सन्मानित करण्यात येणारे प्राचार्य डॉ. मोहिते हे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून भौतिकशास्त्राचे जगातील महत्वाचे शास्त्रज्ञ व संशोधक आहेत. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
मुख्याध्यापिका अश्विनी घारू या रसिकलाल माणिकचंद धारीवाल स्कुल मधील विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून विद्यार्थ्याच्या साठी विविध उपक्रम सातत्याने राबवीत असतात. त्याच बरोबर त्या नाट्य व सिने कलावंत आहेत.
दत्तात्रेय बंडू शिंदे हे रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल येथे मागील तीस वर्षाहून अधिक काळ सहशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी शिरूर मध्ये दहा वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते भोसरी येथे कार्यरत आहे.
बीकेसी प्री प्रायमरी स्कूल मुक्ताईनगर येथील मनीषा दादाभाऊ चौधरी या शिक्षिका असून चौधरी यांनी या पूर्वी श्री.स्वामी समर्थ विद्यालय , पुणे तसेच जीवन विकास विद्यामंदिर , शिरूर या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा केलेली असून २०२४ पासून बी के सी सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल (प्री- प्रायमरी ), मुक्ताई नगर , शिरूर येथे शिक्षण सेवेचे काम करत आहे.
दरम्यान यापूर्वी हलवाई चौक गणेश मंडळाने शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्टपती पदक पुरस्कार प्राप्त शिक्षक दतात्रेय वारे, ज्ञानगंगा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे, संशोधक डॉ. प्रा. बाळकृष्ण लळीत सीताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, प्राचार्य डॉ. अमोल शहा,बोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक प्रा. चंद्रकांत धापटे, अनिता भोगावडे, सीमा आगरवाल, प्राचार्य समीर ओंकार, डॉ.प्रा.क्रांती पैठणकर, प्रा. अलका बेलोटे (बोरुडे) ,प्रा.विलास आंबेकर, दादासाहेब गवारी, नान्सी पायस, प्रसाद शिंदे, नीता पडवळ, क्रीडा शिक्षक नारायण काळे, विद्या विवेक सोळसे (वाघमारे) , मुख्याध्यापिका स्वाती थोरात, डॉ.प्रा.ज्योती धोत्रे, क्रीडा शिक्षक संदीप घावटे, प्रताप भोईटे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, मुख्याध्यापिका ज्योती मुळे, सुनिता बिहाणी, पसक्कीन कासी, ओंकार संगीत विद्यालयाचे प्रमुख गणेश मराठे
आदींच्या प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मान केला आहे.
