विशेषशैक्षणिक

शिरूर शहराच्या इतिहासावर लेखन करावे: डॉ. प्रा. बाळकृष्ण लळीत

शिरूर रिक्रेशन क्लब मध्ये डॉ. लळीत व न्यायधीशपदी निवड झालेल्या सुमेधा वाखारे यांच्या विशेष सन्मान

शिरूर रिक्रेशन क्लब येथे डॉक्टर बाळकृष्ण लळीत व न्यायाधीशपदी निवड झालेल्या सुमेधा बाजीराव वाखारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिरूर दिनांक  (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
≅लोकसंस्कृती व लोककला यांचे संवर्धन करण्याबरोबरच यासर्वांचे संशोधन करता आले अशी कृतार्थची भावना लोकसंस्कृतीचे संशोधक अभ्यासक लेखक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी व्यक्त केली.
डॉ. बाळकृष्ण ललित यांचे मराठी साहित्यातील लेखन व संशोधना संदर्भातील योगदानाबद्दल व शिरूर येथील सुमेधा बाजीराव वाखारे यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल शिरूर रिक्रेशन क्लब (ग्रंथालय )यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शिरूर रिक्रेशन क्लब चे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर, समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त ॲड.अनिल घावटे, शिवसेनेच्या नेत्या विजया टेमगिरे, राहुरी कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. दीपक गायकवाड,प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. व्ही. एच. पाटील, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंद्रकांत चोरडिया, माजी नगरसेवक मंगेश खांडरे,शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड.प्रदीप बारवकर मनसेचे शहराध्यक्ष ॲड. आदित्य मैड , प्रसिद्ध सूत्रसंचालक निवेदक रावसाहेब चक्रे,बांधकाम व्यावसायिक विलास गोसावी ,सामाजिक कार्यकर्ते निलेश नहार , डंबे नाला गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब झाडगे, प्राचार्य समीर ओंकार ,मोहम्मद हुसेन पटेल ,डॉ. मंदा काणे, ॲड. बाजीराव वाखारे, विद्या लळीत, डॉ. सुश्रुत लळीत, संहिता लळित ,डॉ.अश्विनी लळीत, डॉ. दत्ता कारंडे,आदी यावेळी उपस्थित होते.

हलवाई चौक शिरूर येथील वृषाली प्रेम मुसळे यांनी गौरी गणपती समोर पंढरीची वारी हा देखावा सादर केला होता.

लळीत म्हणाले की संतानी समाजातील अज्ञान दूर करुन ज्ञानाचा दीप लावण्याचे काम केले . शिरूर परिसरात काम करत असताना शिरूर परिसरातील कृषी जीवनावर आधारित कृषी लोकगीताचा अभ्यास करता आला. त्याच बरोबर अध्यापक म्हणून काम करत असताना 25 पीएचडी चे विद्यार्थी व २५ एमफीलचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करता आले. 18 संतांचे चरित्र प्रकाशित करता आले.
माणसाने काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत. आपल्याला नीट बोलता आलं पाहिजे भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे व आर्थिकदृष्ट्या संपन्न होत आलं पाहिजे. असे सांगून आयुष्यभर लोककला लोकसंस्कृती लोकभाषा याचा अभ्यास व संशोधन करता आले याबाबत त्यांनी कृतार्थता व्यक्त केली.
ज्याला ज्याची गरज आहे त्या विषयाचे वाचन करावे. शिरूर शहराला परिसराला समृद्ध अशी ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक. शैक्षणिक, व्यावसायिक, संस्कृती असून ही संस्कृती व इथल्या इतिहास हा संपादित करून लेखन होणे आवश्यक आहे. या कामी पुढाकार घ्यावा आपण त्यासाठी सर्वतोपरी मदत करू असेही आश्वासन त्यांनी दिले.
न्यायाधीशपदी निवड झालेल्या सुमेधा वाखारे म्हणाल्या की शिरूर शहरात शासकीय अभ्यासिकेची आवश्यकता आहे . अभ्यासाची,परीक्षेची पुस्तके वाचत असताना अवांतर विषयासंदर्भातील वाचनही महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचण्यासाठी वेळ नसेल अथवा पुस्तके वाचता आली नाही तर किमान ज्यांनी ही पुस्तके वाचली आहेत त्यांच्याशी पुस्तकांचा संदर्भात चर्चा करावी अशी सूचना त्यांनी केली.

आय एम ए शिरूर चे अध्यक्ष डॉक्टर राहुल दत्त उर्फ गणेश यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यश आले नाही तर यश न आलेल्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
सुभाष पवार यावेळी बोलताना म्हणाले की आगामी काळात शिरूर शहरात सुसज्ज अशी अभ्यासिका उभी करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत रवींद्र धनक यांनी केले.ग्रंथालयाचा परिचय
ग्रंथपाल कल्पना राजेंद्र मोरे यांनी करून दिला. आभार मुख्याध्यापक गंगाधर तोडमल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button