Uncategorizedविशेष
रयत शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक कै.हिंदूराव शिंदे यांचे शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025रोजी प्रथम वर्षश्राद्ध
छत्रपती संभाजीनगर ( हुडको कॉलनी ) येथे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम
ā
न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळा शिरुर येथील इंग्रजीचे सेवानिवृत्त शिक्षक हिंदूराव श्रीपती शिंदे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर (हुडको कॉलनी ) येथे आहे. प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सरांना विनम्र अभिवादन. पुण्यस्मरण दिनानिमित्त सरांच्या जीवन कार्याचा घेतलेला आढावा.
सरांच्या जन्म सातारा जिल्ह्यातील मसूर या गावी झाला .शिंदे सर कामा निमित्त सन -१९७४ रोजी शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेत रुजू झाले .
शिरुर येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरच्या रयत शाळेच्या पायाभरणीत बांधकामात मोठे योगदान सरांनी दिले.सर व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी दगड विट्या उचलण्यापासून बांधकामास पाणी मारण्याचे काम करुन बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे काम व्रत म्हणून केले .समाजशास्त्राचे शिक्षक असताना ही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून इंग्रजी अध्यापनाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले .
विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम केले . कडक शिस्तीचे असले तरी विद्यार्थ्यांप्रति अंत्यत कनवाळू व संवेदनशील होते .
कर्मवीर भाउराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचा माध्यमातून महत्त प्रयासाने आणलेली ज्ञानगंगा शिरुर , पारनेर , श्रीगोंदा पारनेर परिसरात घरोघरी शिंदे सरांनी पोहोचवली .
सामान्य घरांतील मुलांना फाडफाड इंग्रजी बोलण्यापर्यत त्यांनी त्यांच्यात बदल घडविला .त्यांनी शिकविलेल्या सिंड्रेलाचा धडा आज ही सर्व विद्यार्थ्याना जसाच्या तसा आठवतो नाट्यमय पध्द्तीने त्याचे शिकवणे सर्वांच्या स्मरणात आहे .
सर दिवसभर शाळेत शिकविण्याचे काम केल्यानंतर रात्री रात्र अभ्यासिकेत ही थांबून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावार बारीक लक्ष ठेवत .सामान्य कुटुंबातील आपल्या आई बापाचे काबाड कष्ट लक्षात घ्या मुलानो उनाडपणा करु नका . शिका आपल्या आई बापाची स्वप्ने साकार करा म्हणून पोटतिडीकीने ते सांगत .सर एवढे कडक शिस्तीचे होते की सर रस्त्यावरुन येताना दिसले की मुले आपल्या क्रिकेट, विटी दांडु व गोट्यांचा खेळ अर्धवट तसाच सोडून पळून जात .एवढा धाक व दरारा सरांचा होता .
सरांचे शिक्षण व माती यावर विलक्षण प्रेम . आपल्या गावाकडील शेतीवरही त्यानी जीवापाड प्रेम केले .
सरांचा या कार्यात त्यांच्या पत्नी शालिनी शिंदे यांनी ही योगदान दिले .
पाषाण मळा, घावटे मळा याठिकाणी बालवाडी शिक्षीका म्हणुन त्यांनी काम केले . त्याच बरोबर खाजगी शिकवणी द्वारे अनेकांचे गणित विज्ञान सोपे करुन अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले . सरांच्या पत्नी शालिनी या कॅंन्सर सारख्या दुर्धर आजाराने गेल्या. पहाडा सारखे असणारे सरांचे व्यक्तिमत्व पत्नी निधनाने नाही म्हटल तरी खचून गेल . त्यातच सरांचे अर्धागवायूचे दुखण आधिक बळावल आणि सरांना सक्तीची बेडरेस्ट घ्यावी लागली . आजारपणात आई वडिलांची सेवा कशी करावी अन आई वडिलांचे आई वडिल कसे व्हावे हे सरांचे तीनही मुले प्रशांत , प्रसाद , उदय व व त्यांचे सर्व कुटुंब यांच्या कडून शिकावे .
आजच्या काळातील ते श्रावण बाळ आहेत . या तीन्ही मुलांचा सर्व स्तरात मैत्रीचा मोठा गोतावळा आहे . दररोज शेकडो जण या परिवाराचा सांत्वना करीता येत . माणंसाची व माणूसकीची श्रीमंती हे शिंदे परीवाराचे आभूषण असून ही श्रीमंती निर्माण करण्यात शिंदे सरांच्या वाट्या मोठा आहे .
सरांचे थोरले चिरंजीव प्रसाद शिंदे हे
शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहे तर सरांच्या शिक्षकी पेशाचा वारसा प्रसाद शिंदे चालवत असून विद्याधाम प्रशालेतील विज्ञान विषयाचे ते शिक्षक आहेत . तर उदय शिंदे हे समस्त मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त असून समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख आहेत .त्याच बरोबर सांगली कोल्हापूर सातारा अर्थात साकोसा जिल्ह्यातील बांधवाचा शिरूर शाखेचे काम ही ते पाहतात.
शिरुरच्या शैक्षणिक सामाजिक ,धार्मिक कार्यात शिंदे यांचा मोठा सहभाग आहे .
कर्मवीर भाउराव पाटील यांच्या विचार व आचारानुसार आचरण कराणा-या शिंदे सरांच्या मृत्यु ही कर्मवीरांच्या जयंतीच्या दिवशी व्हावा ही बाब सरांची कर्मवीरांच्या विचारांशी किती पक्की बांधिलकी होती ही दाखवून देते .
मातोश्री शालिनी व हिंदुराव शिंदे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिंदे परिवाराच्या वतीने घोडनदी येथील कुंभार आळी तील दशक्रिया घाटावर दशक्रिया विधी प्रसंगी दिवंगत व्यक्तीचा फोटो ठेवण्यासाठीचे स्टॅन्ड बसविण्यात येणार आहेत.
सरांच्या प्रथम पुण्य स्मरणदिनानिमित्त विनम्र अभिवादन.