Uncategorized
शिरूर येथे महंमद पैंगबर जयंती निमित्त शनिवार दि. १३ संप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)महंमद पैंगबर जयंतीच्या निमित्ताने शिरूर येथे खिदमद फाउंडेशनचा वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक १३ संप्टेबर २०२५ रोजी शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खिदमद फाउंडेशनचे संस्थापक हाजी मुश्ताक शेख, अध्यक्ष हाजी आसिफभाई, फिरोजभाई बागवान, कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगरसेवक मुन्ना उर्फ आबिद शेख, डॉ. मायकेल, शाबान शहा, फारुख बागवान, योगेश जामदार आदी यावेळी उपस्थित होते.
या महाआरोग्य शिबीरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी सह नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. खिदमद फाउंडेशन शिरूर शहरात विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करत असते.
यंदा आरोग्य तपासणी शिबिराचे ५ वे वर्ष आहे. शिबिराचे उदघाट्न जगप्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
खासदार अमोल कोल्हे, म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णाना साठी काठी, पाण्याची गादी, वॉकर , यासह चाकांची खुर्ची मोफत उपलब्ध करुन देण्यात येते .
यंदाचा शिबिरात जनरल आरोग्य तपासणी सह नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया व चष्मे वाट्प करण्यात येणार असून आधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, श्री. गणेशा हॉस्पिटल व आनंद नेत्रालय यांचा विशेष सहभाग व सहकार्य असल्याचे हाजी आसिफभाई यांनी सांगितले.
