Uncategorized
शिरूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेला हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली.घोडनदीच्या पाण्याची पातळी वाढली

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम-२४}डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने शिरूर तालुक्यातील घोडनदीतील पाणीपातळी सतत वाढत आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान घोडनदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीने शिरूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेला हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ही पाण्याखाली गेला आहे.
शिरूर नगरपरिषदेमार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नदीकाठच्या सर्व नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्राजवळ कोणत्याही कारणासाठी न जाण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
परिस्थिती वर लक्ष ठेवून असल्याचे ही तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले .
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, सुरक्षिततेसाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने स्थलांतरित नागरिकांची निवाराची व्यवस्था शाळांमधून केली असून नदीकाठच्या नागरिकांना धोक्याच्या सूचना रिक्षा द्वारे दिल्या असल्याचे मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील यांनी सांगितले.

–