शिरूर (वार्ताहर) :
डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने घोड नदीतील पाणीपातळी सतत वाढत आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा शिरूर नगरपरिषदेमार्फत देण्यात आला आहे.
नदीकाठच्या सर्व नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्राजवळ कोणत्याही कारणासाठी न जाण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, आपल्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्कता आवश्यक असून प्रशासनाने तातडीने दक्षता बाळगली आहे.