राष्ट्रीयशैक्षणिक

आर. एम. धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल येथील राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत ३२० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

oplus_131106
oplus_131074

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) :
आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत तब्बल ३२० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद आणि फिरता चषक डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, बाबुराव नगर, शिरूर यांनी पटकावला.
बालवाडी मोठा गट ते इयत्ता नववी अशा पाच गटांमध्ये विभागून स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी, सिने कलावंत व दिग्दर्शक अयुब खान यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या काळात मनोरंजन क्षेत्रात विविध साधने उपलब्ध आहेत. रील्सचे प्रस्थ वाढले आहे. नाट्य व चित्रपटसृष्टीत करिअरसाठी संधी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नाट्यछटा सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा पायरीचा दगड ठरतात. बक्षीस मिळो अथवा न मिळो, स्पर्धांमध्ये सहभागी होत राहणे गरजेचे आहे.”
गट निहाय निकाल पुढीलप्रमाणे :
बालवाडी गट : प्रथम – शुभा गणेश गोरे, द्वितीय – प्रिशा प्ररमेश्वर दणाणे, तृतीय – शिव कृष्णा फराटेडेली न्यूज पोस्ट टीम च्या वतीने हार्दिक शुभेच्छा
गट एक (इयत्ता १ली-२री) : प्रथम – शिवांश मोटे, द्वितीय – खुशी मितेश गादिया, तृतीय – गार्गी किशोर सयाजी, उत्तेजनार्थ – जानवी धाडगे, युवांश ओस्तवाल, कार्तिक शेळके
गट दोन (इयत्ता ३री-४थी) : प्रथम – हिताली कर्नावट, द्वितीय – आर्या पाटील, तृतीय – मानसी खणकर, उत्तेजनार्थ – श्रेयांश घोडके, अनन्या पाटील
गट तीन (इयत्ता ५वी-७वी) : प्रथम – आरुष बेडेकर व स्वराज मांढरे, द्वितीय – शौर्य राठोड, तृतीय – अल्फिया खान व संस्कृती नरवडे, उत्तेजनार्थ – आराध्या पाटील, सिद्धी मोरे
गट चार (इयत्ता ८वी-९वी) : प्रथम – राजसी भणगे, द्वितीय – आरुष पाटील, तृतीय – गार्गी मोरे, उत्तेजनार्थ – सिद्धी गोंटे
पारितोषिक वितरण समारंभास शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, सदस्य चंदुलाल चोरडिया, प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक दीपक घारू, बालाजी विद्यापीठाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक समीर ओंकार, विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या अश्विनी घारू यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे हेच स्पर्धेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर नंदकुमार निकम यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन केले.
स्पर्धेच्या परीक्षक मंडळात अयुब खान, दीपक घारू, प्रा. सतीश धुमाळ, डॉ. सुनिता पोटे, डॉ. समता भिसे, सुनंदा गोसावी, नीता गायकवाड, राणी बनकर, उषा वाखारे, अपर्णा वाळसे, योगिता तंटक, तृप्ती आगळे, प्रीती सोनवणे, वैशाली जोशी, सायली पटवर्धन, प्रतिभा बिरादार व राजश्री पठारे यांचा समावेश होता.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा व सदस्य धरमचंद फुलफगर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button