Uncategorized
शिरूर मध्ये दुर्गा दौड व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे ठिक ठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलाच्या वर्षावात स्वागत.







शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
विजयादशमी अर्थात दसरा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिरूर शहरातून संचलन करण्यात आले.
संचलनाचे व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शिरूर यांनी आयोजित केलेल्या दुर्गादौडचे ठिक ठिकाणी फुलांच्या वर्षाव करून व रांगोळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले.
रयत शाळेच्या मैदानावर ध्वजारोहन झाल्यावर संघाच्या संचलनास सुरवात झाली. शहरातील मुलकी वसाहत, राम आळी, मारूती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, यशवंतराव चव्हाण चौक, आडत बाजार, बसस्थानक परिसर या भागातून हे संचलन गेले.


हलवाई चौकात संचलनाचे स्वागत करण्यात आले.
नवरात्री निमित्त शिरूर शहरात मागील दहा दिवस दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले त्यास युवक युवतीच्या उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आजही दसरानिमित्त शिरूर शहरातून दुर्गा दौड आयोजित करण्यात आली. दौडीत विद्यार्थी विदयार्थिनी युवक युवती फेटे बांधून सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज व देवीच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आले.
ठिकठिकाणी फटाके वाजवून व रांगोळी पायघड्या घालून व फुलाच्या वर्षावात दौडचे स्वागत करण्यात आले.
