शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) विद्यार्थ्यांच्या संशोधन कौशल्यांना वाव मिळावा आणि नवकल्पनांना चालना मिळावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ‘आविष्कार – विभागीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प स्पर्धा यंदा ४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडणार आहे.
ही स्पर्धा विद्यापीठाच्या पुणे ग्रामीण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून, कला, वाणिज्य, विज्ञान , अभियांत्रिकी, तसेच फार्मसी अशी एकूण २० महाविद्यालयांतील सुमारे २५० संशोधन प्रकल्प व ४०० हून अधिक विद्यार्थी त्यांच्या विविध क्षेत्रांतील संशोधन प्रकल्पांसह सहभाग नोंदवला आहे.
विज्ञान, समाजशास्त्र, वाणिज्य, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, मानववंशशास्त्र अशा विविध शाखांतील प्रकल्पांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के सी मोहिते यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक *डॉ. प्रशांत साठे* यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून *प्राचार्य नंदकुमार निकम* सर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान *डॉ. काकासाहेब मोहिते भूषवणार असून, डॉ. योगेश सेठी हे स्पर्धेचे समन्वयक म्हणून नियोजन पाहत आहेत.
त्याचप्रमाणे उपप्राचार्य प्राध्यापक हरिदास जाधव, विज्ञान विद्या शाखा प्रमुख डॉ. नारायण घनगावकर, अकॅडमिक रिसर्च समन्वयक डॉ. सुनील भोईटे हे मार्गदर्शन करत आहे.
स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची, परीक्षकांशी संवाद साधण्याची व नवीन कल्पनांना व्यासपीठ मिळवण्याची संधी मिळणार आहे. प्रकल्पांचे परीक्षण विद्यापीठाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीकडून केले जाणार आहे. विजेत्या प्रकल्पांची निवड विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या अंतिम ‘आविष्कार’ स्पर्धेसाठी होणार आहे.चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाने यापूर्वीही अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केले आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने शिरूर परिसरात शैक्षणिक चळवळीस नवीन बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने शिरूर परिसरात शैक्षणिक चळवळीस नवीन बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.