शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा या संस्थेची सन २०२५ ते २०२८ या त्रैवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध झाली. या निवडणुकीत सर्व संचालक एकमताने निवडून आले.
सन २०२१ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण पुणे जिल्हा व पुणे शहर आहे. पुणे जिल्हा व शहरातील सुमारे २०० शिक्षणसंस्था या मंडळाच्या सभासद आहेत. शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे.
बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
विजय कोलते, अनिल मेहेर, ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, सौ. प्रमिला गायकवाड, प्रदीप वळसे पाटील, महेश ढमढेरे, संग्राम कोंडे देशमुख, संग्राम मोहोळ, गणपत बालवडकर, प्रसन्नकुमार देशमुख, वीरसिंह रणसिंग, महादेव कांचन, संदीप कदम, सौ. जयश्री पलांडे, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण भोसले, अजित वडगावकर, डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. नंदकुमार निकम व नंदकुमार शेलार.
निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, उपाध्यक्ष अनिल मेहेर, प्रदीप वळसे पाटील, आप्पासाहेब बालवडकर आणि महेश ढमढेरे यांनी विशेष प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. वि. ल. पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. हनुमंत काळे यांनी काम पाहिले.