आयुष्यामध्ये जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम धंदा करून गुजराण करत असते. आपलं जीवन जगताना पैसे कमावताना ते कुठल्या मार्गाने कमवायचे हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा विषय व संस्काराचा भाग. त्यामुळे अनेक जण शॉर्टकट दिसत असताना ही यशाच्या करिता शॉर्टकट चा वापर न करता आपल्या ध्येय धोरणानुसार तत्त्वानुसार इथिक नुसार आपला जीवन मार्ग निवडतात.
याचा कुठेही बडे जाव न करता, साधेपणाने नम्रपणे आपले जीवन जगतात.खरंतर या व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे सोन्याच्या लकाकी सारखं असतं.परंतु ते मात्र अत्यंत नम्रपणे सचोटीने आपले जीवन व्यतित करतात नव काही शिकण्याची उर्मी त्यांच्या अंगी असते. इतराचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणे,अभ्यासाने प्रगटणे व मोजके व मुद्देसूद बोलणे, आपला वेळ आपल्या विषयाचा अभ्यासामध्ये घालवणे,
आपली वैचारिक बैठक ही सातत्याने सुधारत नेणे, समाजाच्या कामासाठी पुढाकार घेणे. प्रचंड विद्वत्ता असतानाही नवीन शिकण्यासाठी तयार असणे व इतरांच्या आदर व्यक्त करणे व सतत आपल्या कामात राहून आपले काम प्रामाणिकपणे करणे असं व्यक्तिमत्व म्हणजे शिरूर मधील खारेमळा येथील डॉ. किरण बाबूराव तरटे.
कमी बोलणे हा त्यांचा नम्रतेचा भाग आहे. बोलणे कमी व कृती जास्त हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

