शिरूर हुन मुंबई कडे जाणारा नवीन महामार्ग
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूरकर व मराठवाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईकडे जाण्याकरिता शिरूर कर्ज असा नव्या महामार्ग प्रस्तावित असून हा मार्ग झाल्यावर मुंबईस जलद गतीने जाता येणार आहे.
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीचे कोंडी त्याचबरोबर पुणे शहर व चाकण परिसरातील वाहतूक कोंडी या सर्वांमुळे मुंबईकडे प्रवासाकरता जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो या वाहतूक कोंडीमुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो. या बाबी लक्षात घेऊन शासनाने शिरूर कर्जत अशा मुंबईकडे जाणारा नवीन महामार्ग प्रस्तावित केला आहे.
हा महामार्ग १३५ किलोमीटर लांबीचा चार पदरी महामार्ग असून, त्यासाठी अंदाजे १२,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रास्तावित महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागून मुंबईकडे जाण्यासाठी जलद महामार्ग उपलब्ध होईल अशी आशा आहे.प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत अपेक्षित असून, भूसंपादनासाठी ६७० हेक्टर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. महामार्गावर ५ बोगदे, ६ मोठे आणि ४८ लहान पूल उभारले जाणार आहेत.
हा महामार्ग झाल्यावर रांजणगाव औद्योगिक वसाहत,चाकण औद्योगिक वसाहत, यांना औद्योगिक व व्यापारी वाहतूक मुंबई पर्यंत सुलभ होईल.त्याचबरोबर या परिसरातील शेतकऱ्यांना व प्रवाशांना कमी वेळेत मुंबई पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
हा महामार्ग शिरूर–पाबळ–राजगुरूनगर–शिरवली– पाईट–कर्जत असा १३५ किमी लांबीचा मार्ग असणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.
शिरूर चे महत्व वाढणार
पुणे अहिल्या महामार्गावरील शिरूर एक महत्त्वाचे वेगाने वाढणारे शहर असून रांजणगाव, कारेगाव, एमआयडीसी व सुपा एमआयडीसी तसेच शिरूर शहराच्या लगत उभी राहत असणारी करडे एमआयडीसी या सर्वांमुळे मुळे शिरूरच्या नागरीकरणाचा वेग मोठा आहे. त्याचबरोबर शिरुर हे शिरूर,श्रीगोंदा पारनेर या तीन तालुक्याची बाजारपेठ असून शैक्षणिक हब म्हणूनही शिरूरची ओळख निर्माण होत आहे. अनेक वैद्यकीय सुविधांनी युक्त अशी मोठी हॉस्पिटल उभी राहिली आहेत.शहरात मोठे गृहनिर्माण प्रकल्प शिरूर परिसरात उभे राहत आहे.
सहकारी व सरकारी बँकेचे पतसंस्थांचे शहरांमध्ये मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहराची आर्थिक उलाढाल वाढत आहे. शहरात पासपोर्ट ऑफिसही सुरू झालेले आहे. पी एम पी एल ची बस सेवा शिरूर शहरात दीड वर्षापूर्वी सुरू झाली आहे. पुण्याकडून विदर्भ मराठवाडा व विदर्भ मराठवाड्यातील विविध शहरातून पुणे शहराकडे दररोज शेकडोनी एसटी बसेस शिरूर मार्गे धावतात. शिरूर बस स्थानकात त्यामुळे प्रवाश्यांची सातत्याने मोठी वर्दळ असते .त्याचबरोबर शिरूर नगर परिषदेची हद्द वाढ करण्याची मागणी होत आहे. भविष्यात पुणे नगर महामार्गावरील शिरूर मोठे शहर होणार असून शहरातून कल्याण, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,पुणे, अहिल्यानगर,सोलापूर, बीड,मुंबई जालना या ठिकाणी जाण्याकरिता उत्तम रस्त्यांचे जाळे उभे राहत आहे. उरण रस्त्यामुळे शिरूरकरांना मुंबई ही जवळची होणार आहे. त्याचबरोबर विदर्भ,मराठवाड्याकडील प्रवासी वाहतूक सह कृषी व औद्योगिक वाहतूक, व्यापारी वाहतूक ही मुंबईला शिरूर मार्गे होणार असल्याने शिरूरचे महत्त्व वाढणार असून शिरूरची कनेक्टिव्हिटी वाढत जाणार आहे.त्याचा फायदा शिरूर चे नागरीकरण व शहरीकरण वाढण्यावर होणार आहे. त्याचबरोबर प्रस्तावित पुणे छत्रपती संभाजी नगर तीन मजली रस्ता, पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॅरीडोर रस्ता , पुणे अहिल्यानगर रेल्वे शिरूर शहरा लगत जात असून ह्या रेल्वे मार्गांमुळे ही शिरूर परिसराचे महत्त्व व्यापारी व नागरीकरणाच्या दृष्टीने मोठे वाढणार आहे.