Uncategorized
शिरूरचे ओंकार सुधीर कडेकर यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर शहरातील मुंबई बाजार परिसरातील ओंकार सुधीर कडेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या Assistant Geologist (Rank 6) आणि Junior Geologist (Rank 16) या वर्ग-२ पदांसाठी पात्रता प्राप्त केली आहे.
ओंकार हे सौ. सुनिता व व्यावसायिक सुधीर रघुनाथ कडेकर यांचे सुपुत्र तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर यांचे पुतणे आहेत.
ओंकार यांचे शिक्षण सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. (भूगर्भशास्त्र) या शाखेत झाले आहे. शिक्षणानंतर त्यांनी केंद्रीय भूमिजल मंडळ, पुणे येथे संशोधक म्हणून कार्य सुरू केले.

नोकरीची जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांनी शासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी सातत्याने आणि नियोजनपूर्वक केली.
अभ्यासातील चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ओंकार यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे पालकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.
“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास — तुका म्हणे” या उक्तीप्रमाणे एकाच ध्येयावर न थांबता ओंकार यांनी उच्च ध्येय गाठले आहे. त्यांचे हे यश शिरूर तसेच पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ओंकार कडेकर यांचे यश हे संयम, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
¸
