Uncategorized

मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा; माजी आमदार अशोक पवारांची मागणी

शिरूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अशोक पवारशिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषदेच्या मतदार यादी व वार्ड रचनेतील घोळ तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी केली. “काहींच्या सोयीसाठी वार्ड रचना करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित करून  यासंदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे. पक्षीय पातळीवरही या अन्यायकारक रचनेविरोधात संघर्ष उभा करू,” असा इशारा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,  माजी नगरसेविका माया गायकवाड, मंगेश खांडरे, मुन्ना शेख, रवींद्र खांडरे, कैलास भोसले, जगन्नाथ पाचारणे, काँग्रेस आयचे अल्पसंख्याक आघाडीचे अजीमभाई सय्यद राहील खान , कलीम सय्यद, आदी उपस्थित होते.

माजी आमदार पवार म्हणाले, “शिरूर नगरपरिषदेची वार्ड रचना ही सत्ताधाऱ्यांना अनुकूल ठरावी, यासाठीच आखण्यात आली का, असा संशय निर्माण होतो. काही प्रभागांत मतदारसंख्या अत्यंत असमतोल आहे. उदाहरणार्थ, क्रमांक ६ च्या वार्डात फक्त १३७० मतदार नोंदवले गेले असून, इतर ठिकाणी मतदार संख्येत तफावत निर्माण केली आहे. पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार यादी निर्दोष असणे अत्यावश्यक आहे.”
मतदार यादीतील या घोळाबाबत उच्च न्यायालयात मुज्जफर कुरेशी यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अनेक मतदारांची नावे चुकीच्या वार्डांत गेली आहेत. शिरूरमध्ये असे प्रकार प्रथमच घडले आहेत. सर्व पक्षांनी यावर भूमिका घ्यावी,” असे पवार म्हणाले.
आधारकार्डांच्या आधारे काही मतदारांचे वार्ड बदलण्यात आले आहेत. या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे. बोगस व दुबार मतदार यादीतून वगळले गेले नाहीत, तर खरी लोकशाही धोक्यात येईल.”
पवार यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाशी याबाबत संपर्क साधला जाणार असून, वाघोली परिसरातही दुबार मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
“बोगस मतदार म्हणजे लोकशाहीला धोका — या घोळाचा सखोल तपास झाला पाहिजे,” असे पवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button