राष्ट्रीयविशेष

जयघोषात पार पडली छठ पूजा – सूर्य उपासनेचा महापर्व भक्तिभावाने साजरा

शिरूरच्या घोडनदी किनारी शेकडो उत्तर भारतीय बांधवाची उपस्थिती

oplus_131074
oplus_131074

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर परिसरातील लाटेआळी येथील शनी मंदिर घाटावर आज संध्याकाळी “माता रानी की जय” या जयघोषात शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत छठ महापर्वाची सुरुवात केली. घोडनदीच्या शांत किनाऱ्यावर सजलेल्या दीपांनी, रांगोळ्यांनी आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात या सूर्योपासनेच्या पवित्र पर्वाला एक अद्भुत दिव्यता लाभली.
शिरूर येथे सन १९९७ पासून उत्तर भारतीय बांधवानी सुरू झालेली ही सार्वजनिक छठ पूजा सुरु केली . यंदाही लाटेआळीतील शनी मंदिराजवळील गणेश घाटावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. घाट परिसर रंगीबेरंगी फुलांनी आणि पारंपरिक सजावटींनी उजळला होता.
छठ पूजेच्या या पर्वात सूर्यदेव आणि देवी यांची उपासना केली जाते. हे पर्व निसर्ग, सूर्य आणि मानव यांच्यातील संबंध दृढ करणारे मानले जाते. शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी तसेच परिवाराच्या आरोग्य आणि प्रगतीसाठी ही पूजा केली जाते. उपासक पहाटे नदीकाठी स्नान करून, उपवास पाळतात. ऊस, फळे, गूळ, नारळ, या नैसर्गिक अन्नपदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो.
संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यदेवाला नमस्कार केला जातो आणि दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याची पूजा करून या महापर्वाची सांगता होते.
भक्तिभावाने नटलेला घाट परिसर
घाटावर वाजणाऱ्या बँडच्या भक्ती संगीताने व पारंपरिक भजनांनी
वातावरण अधिकच भारावले होते. महिलांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले, तर लहान मुलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. भक्तांच्या स्वागतासाठी सुंदर कमान उभारण्यात आली होती. परगावाहून आलेल्या भाविकांसाठी निवास आणि वाहनव्यवस्थाही उत्तमरीत्या करण्यात आली होती.
या सोहळ्याला पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी नगरसेवक संदीप गायकवाड,पंडित उमाकांत मिश्रा,शशिकांत दुबे,ब्रिजेश पाठक, प्रेमचंद मिश्रा, मिथलेस सिंग, लालसाहब मोर्या, रघुनाथ उपाध्याय, बी के राव, नंदन कुमार, श्रीनाथ प्रसाद, श्रीराम चौधरी, गोबिंद सिंग रणवीर सिंह, शर्वेश सिंह, रामसिंह भैय्या, नितेश पाठक, चंद्रकांत दुबे, चंचल मिश्रा, बी. के. श्रीवास्तव, बी. के सिंग, श्याम यादव दिनेश वर्मा, शैलेश मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक कलाकार शंकर चाबुकस्वार यांनी घाट परिसरात आकर्षक रांगोळ्यांनी शोभा वाढवली.
छठ पूजा म्हणजे केवळ धार्मिक अनुष्ठान नव्हे, तर सूर्यप्रकाशासारखी आशा, श्रद्धा आणि एकतेची किरणे मानवतेच्या मनात पेरणारा उत्सव आहे.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने शिरूरने भक्तिभाव, संस्कृती आणि ऐक्य यांचा सुरेख मिलाफ अनुभवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button