Uncategorizedविशेष
रक्तदान, हिमोग्लोबिन व मोफत नेत्र तपासणी शिबिरात १०८ जणांचे रक्तदान
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) — वाणी के जादूगर प.पू. गुरुदेव श्री रमणीक मुनिजी म.सा. यांच्या ५९ व्या जन्मदिनानिमित्त तसेच महाराष्ट्र गौरव, खानदेश केसरी प.पू. श्री गौतम मुनिजी म.सा. (बरसादाता), तथा युवा प्रेरक प.पू. श्री चेतन मुनिजी म.सा. यांच्या चातुर्मासार्थ ॲक्टिव्ह सोशल ग्रुप, शिरूर यांच्या वतीने रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यात १२० हुन अधिक जणांनी नेत्र तपासणी व १०८ जणांनी रक्तदान केल्याची माहिती कामिनी प्रकाश बाफना यांनी दिली .हे शिबिर रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जैन पंचायत भवन, नगरपालिका समोर, शिरूर येथे झाले.
शिबिरासाठी विशेष सहकार्य श्री सकल जैन समाज, शिरूर, आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक, श्रीराम बांगड रक्तदान नाते ट्रस्ट, पुणे यांचे होते.या उपक्रमाचा उद्देश — “रक्तदान करा, राष्ट्रीय एकात्मता वाढवा” — या संदेशाचा प्रसार करून समाजात आरोग्यजागर निर्माण करणे असल्याचे कामिनी बाफना यांनी सांगितले .
नेत्रतपासणी करण्यात आलेल्या १३ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.शिबीरास रक्ताचे नाते ट्रस्टचे रामभाऊ बांगड, संघपती मुन्ना चोरडडिया यांनी भेट दिली.


शिबिरात बरसादाता श्री. गौतममुनीजी महाराज यांच्यासह अशोक गांधी यांनी ७१ व प्रकाश बाफना यांनी ४९ वे सतीश धुमाळ यांनी ५८ वे तसेच व्हिजन इंटरनॅशनल स्कुलचे विकास पोखरणा व व्यसायिक मुकेश संघवी, राज संदीप बिहाणी यांनी रक्तदान केले.