विशेष
आली रे आली बाबुराव नगर मध्ये पीएमपीएमएलची बस आली
बाबुराव नगर मधील ज्ञानगंगा विश्व् विद्यालय शिरूर कारेगाव असा नवीन बस मार्ग सुरु
-

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}-गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने मागणी होत असलेल्या शिरूर शहरा लगत असणारा बाबुराव नगर येथे सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर पासून पीएमपीएमएल { पुणे महानगर परिवहन मंडळ } बससेवेचा नवीन मार्ग कारेगाव ते शिरूर (बाबूराव नगर ) असा सुरु झाला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी शिरूर शहरात पीएमपीएमएल ची सेवा सुरु झाली या पीएमपीएमएल सेवेचा विस्तार बाबुराव नगर सह शहरातील विविध उपनगरात व्हावा व बससेवाच्या फे-या वाढव्यात अशी मागणी केली जात होती .आज सकाळी बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा विश्व् विद्या लय येथे पीएमपीएमएलचा बाबुराव नगर ते कारेगाव या बससेवेचा शुभारंभ वाघोलीचे डेपो मॅनेजर विजय मदगे,प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते,प्रा. डॉ. राजेराम घावटे, प्राचार्य डॉ. अमोल शहा,प्राचार्य डॉ. समीर ओंकार, सरपंच जगदीश पाचर्णे, माजी उपसरपंच संभाजीराव कर्डीले, अनिल लोंढे,डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर, अमृतेश्वरी घावटे, दादाभाऊ चौधरी, तिकोणे सर, गौरव प्रकाश बाफना, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या बोरा महाविद्यालयाचे केंद्र संयोजक प्रा.केत,पीएमपीएमएलचे महेश गायकवाड, संजय वारघडे, अभिजित ढगे, संजय जगताप, बंडू ढाकणे, प्रवीण गायकवाड, ईश्वर काळे, दिनकर शिर्के मुख्याध्यापक गौरव खुटाळ,, सुनंदा लंघे, जयश्री खणसे यांच्या सह
संदीप बिहाणी, राजू शेख, साबिरभाई शेख, बाळासाहेब शेवाळे, सुनील घावटे, दीपक घावटे, प्रफुल्ल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.या मार्गावर बससेवा सुरु व्हावी यासाठी माजी सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर व डॉ. राजेराम घावटे यांनी पाठपुरावा केला होता.माजी सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मोबाईल वरून कार्यक्रमास संबोधित करतांना सांगितले की बाबुराव नगर कारेगाव बससेवेमुळे कामगार व विद्यार्थी यांची मोठी सोय झाली आहे. भविष्यात शहराच्या वाढत्या विस्तार लक्षात घेता बससेवा मार्गाचा विस्तार करावा. जास्तीजास्त नागरिकांनी या बससेवेचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले .शिरूर शहराचा मोठया वेगाने विस्तार होत आहे. शिरूर हे व्यापारी बाजारपेठे सह शैक्षणिक हब आहे. पुणे येथे शिरूर मधून शिक्षण रोजगार व व्यापारा निमित्त दररोज मोठया संख्येने नागरिक जात असतात.

पीएमपीएमएलचा बसेसचा फे-या शिरूर मधून वाढव्यात. थेट शिरूर साठी वाघोली येथून रात्री नऊ वाजता बस सुरु करावी. मुक्कामी बससेवा शिरूर ला सुरु करून पहाटे सहा वाजता थेट वाघोलीस जाण्या करिता बस सुरु करावी अश्या मागण्या त्यांनी केल्या.
डॉ. प्रा.राजेराम घावटे म्हणाले की बाबुराव नगर परिसरात शैक्षणिक संस्थाचे जाळे असून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याच बरोबर मोठे गृहप्रकल्प आहेत. बाबुराव नगर खे्रीज शेजारील परिसरास ही या बससेवेचा फायदा होणार आहे. या परिसरात सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु होणे गरजेची होती.
पीएमपीएमएल वाघोली आगार व्यवस्थापक विजय मदगे म्हणाले की ग्रामीण भागात ही पीएमपीएमएल सेवेचा विस्तार होत आहे. शिरूर शहरात मुक्कामी बससेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु शिरूर मार्गावर सध्या इलेक्ट्रिकल्स बसेस धावतात व चार्जिंग स्टेशन पुण्यात असल्याने शिरूरला मुक्कामी बस पाठविणे शक्य नाही. परंतु शिरूर मार्गांवर सीएनजी बससेवा सुरु झाल्यावर मुक्कामी बससेवा सुरु करण्या बाबतचे आश्वासन त्यांनी दिले. पीएमपीएमएल बसेसचा विविध पासेस संदर्भात ही त्यांनी माहिती दिली.
यावेळी बसचालक व बसवाहक यांचा फेटा बांधून व शाल देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ. अमोल शहा, प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांचे ही मनोगते झाली. काळुराम गवारी यांनी आभार मानले.

ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या प्रवेशद्वारा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रा. राजेराम घावटे व अमृतेश्वरी घावटे यांनी तर सी टी बोरा कॉलेज च्या प्रवेशद्वारावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी बसचे स्वागत केले.. डेक्कन स्कूलच्या वतीनेही प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी बसचालक व वाहक सन्मान केला.
यावेळी बस ही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती ढोल ताश्यांचा गजरात बसचे स्वागत ज्ञानगंगा विश्व् विद्यालयांचा विद्यार्थ्यांनी केले.त्यानंतर फीत कापून व झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

शिरूर – कारेगाव बसमार्ग – ज्ञानगंगा विश्व् विद्यालय, चंदन चौक, सी. टी. बोरा कॉलेज, निर्मल प्लाझा, शिरूर नगरपरिषद दवाखाना, प्रशासकीय इमारत, शिरूर नगरपरिषद दवाखाना, एलआयसी ऑफिस, शिरूर बसस्थानक, बाजार समिती, रामलिंग फाटा, शिरूर नगर परिषद, मंगलमूर्ती नगर, रिलायन्स पेट्रोल पंप, बो-हाडे मळा, न्हावरा फाटा, सरदवाडी, कारेगाव यशइन चौक
कारेगाव – शिरूर बसमार्ग पुढील प्रमाणे – यशइन चौक, कारेगाव, सरदवाडी, न्हावरे फाटा, रिलायन्स पेट्रोल पंप मंगलमूर्ती नगर, शिरूर नगरपरिषद, रामालिंग फाटा, बाजार समिती, एस. टी. बसस्थानक, एलआयसी ऑफिस, शिरूर नगरपरिषद दवाखाना, प्रशासकीय इमारत, शिरूर शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, शिरूर नगरपरिषद दवाखाना, निर्मल प्लाझा, सी. टी. बोरा कॉलेज, चंदन चौक, ज्ञानगंगा विश्व् विद्यालय बाबुराव नगर
शिरूर – कारेगाव – वाघोली बसमार्ग – ज्ञानगंगा विश्व् विद्यालय, चंदन चौक, सी. टी. बोरा कॉलेज, निर्मल प्लाझा, शिरूर नगरपरिषद दवाखाना, प्रशासकीय इमारत, शिरूर नगरपरिषद दवाखाना, एलआयसी ऑफिस, शिरूर बसस्थानक, बाजार समिती, रामलिंग फाटा, शिरूर नगर परिषद, मंगलमूर्ती नगर, रिलायन्स पेट्रोल पंप, बो-हाडे मळा, न्हावरा फाटा, सरदवाडी, कारेगाव यशइन चौक, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव, लोणीकंद, वाघोली. वाघोली -कारेगाव – शिरूर बसमार्ग बसमार्ग पुढील प्रमाणे – वाघोली, लोणीकंद, कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती,यशइन चौक, कारेगाव, सरदवाडी, न्हावरे फाटा, रिलायन्स पेट्रोल पंप मंगलमूर्ती नगर, शिरूर नगरपरिषद, रामालिंग फाटा, बाजार समिती, एस. टी. बसस्थानक, एलआयसी ऑफिस, शिरूर नगरपरिषद दवाखाना, प्रशासकीय इमारत, शिरूर शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, शिरूर नगरपरिषद दवाखाना, निर्मल प्लाझा, सी. टी. बोरा कॉलेज, चंदन चौक, ज्ञानगंगा विश्व् विद्यालय बाबुराव नगर