Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरूर घोडनदी येथे जिल्हा व सत्र न्यायालय – जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेला यश

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) – शिरूर आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची जिल्हा सत्र न्यायालय शिरुर मध्ये असावे मागणी अखेर पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिरूर घोडनदी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर)  स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या न्यायालयांसाठी आवश्यक पदनिर्मितीला देखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

हा निर्णय विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावावर घेण्यात आला असून, त्यानुसार शिरूर घोडनदी येथे नवीन न्यायालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचविण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.आजपर्यंत शिरूर व परिसरातील नागरिकांना विविध प्रकरणांसाठी – दिवाणी दावे, फौजदारी अपिले, मोटार अपघात दावे, भूसंपादन प्रकरणे इत्यादींसाठी – पुणे शहरात वारंवार प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. आता शिरूर घोडनदी येथेच जिल्हा न्यायालय स्थापन झाल्याने नागरिकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेला न्याय – आमदार माऊली कटके या निर्णया विषयी प्रतिक्रिया देताना शिरूरचे आमदार माऊली कटके म्हणाले,शिरूर मतदारसंघातील जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेला आज न्याय मिळाला आहे. शिरूर घोडनदी येथे न्यायालयाची स्थापना हा न्याय लोकांच्या दारी आणणारा आणि प्रशासनाला अधिक जबाबदार बनवणारा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. आता स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी पुण्यापर्यंत जाण्याची गरज राहणार नाही.”ज्येष्ठ विधीज्ञ आणि घोडनदी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिरीष लोळगे यांनी सांगितले की,“शिरूर येथे दीडशे वर्षांपासून न्यायालय आहे. मात्र, पाच लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीचे दावे, दिवाणी आपिले, फौजदारी अपिले किंवा भूसंपादनाशी संबंधित प्रकरणे दाखल करण्यासाठी पुण्यात जावे लागत होते. त्यामुळे वकील आणि पक्षकार या दोघांनाही आर्थिक व वेळेचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत होतो, आणि आज ती पूर्ण झाली हे आमच्यासाठी आनंददायी आहे.”

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन

मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

लोळगे यांनी पुढे सांगितले की, सध्या शिरूर न्यायालयात चार न्यायाधीश कार्यरत आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेनंतर ही संख्या सहा होणार असून, भविष्यातील गरज लक्षात घेता नव्या इमारतीत १२ न्यायाधीशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिरूर घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. उदय सरोदे यांनी सांगितले की,“या न्यायालयामुळे लोकांना जलद आणि सुलभ न्याय मिळणार आहे. वकील व पक्षकारांना आता पुण्यापर्यंत प्रवास करण्याची गरज उरणार नाही. घोडनदी असोसिएशनच्या वतीने या मागणीसाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आम्ही शासनाचे मनःपूर्वक आभार मानतो.”

न्याय लोकांच्या दारी

शिरूर घोडनदी येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना हा निर्णय फक्त न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे तर ग्रामीण भागातील प्रशासनाच्या विकेंद्रीकरणासाठीही एक ऐतिहासिक पाऊल ठरला आहे. या निर्णयामुळे शिरूर तालुका व परिसरातील हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवरच न्याय मिळेल,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button