राष्ट्रीयविशेष

अखेर बिबट्याचा शार्प शूटरने घेतला वेध.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}गेल्या अनेक दिवसापासून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मोठ्या उच्छाद मांडलेल्या व तेथील जनजीवन विस्कळीत केलेल्या नरभक्षक बिबट्यास अखेर रात्री गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वनविभागाने नेमलेल्या शार्प शुटर पथकाने ही कामगिरी केली.

मागील पंधरा दिवसात या परिसरातील रोहन बोंबे वय १३ , शिवन्या बोंबे वय -५ वर्ष यांच्या सह ज्येष्ठ महिला भागूबाई रंगनाथ जाधव वय ८५ रा. जांबूत या तिघांवर बिबट्याने हल्ल्या करीत त्यांचे प्राण घेतल्याने या परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनांनी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनासह गावबंद आंदोलन केले होते. त्याच बरोबर वनखात्याचा कार्यालयाची मोडतोड करून जाळपोळ केली होती. ४ नोव्हेंबर रोजी पिंजरात पकडलेल्या बिबट्यास त्याचे तेथून इतरत्र रवानगी करण्यास ही विरोध केला होता. त्या बिबटयास ही रात्री माणिक डोह बिबट्या निवारण केंद्र येथे नेण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा संतप्त भावना व झालेले आंदोलन यानंतर वनविभागाचा वतीने या नरभक्षक बिबट्यास जेरबंद अथवा ठार करण्यासाठी वनसरंक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची परवानगी घेतली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही पिंपरखेडला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

 पिंपरखेड परिसरात रेस्क्यू या संस्थेचे डॉ.प्रसाद दाभोलकर,जबीन पेस्टवाला, डॉ.सात्विक पाठक व दोन शार्प शुटर दाखल झाले होते.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन
मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

या परिसरात ठिकठीकाणी लावलेल्या कॅमेराच्या निरीक्षणातून बिबट्या जा-ये करीत अससेल्या मार्गावरील त्यांच्या पायाचे ठसे या द्वारे बिबट्याचा माग घेण्यात आला. थर्मल ड्रोन कॅमेरेच्या आधारे बिबट्याचा शोध घेण्यात आला असता घटनास्थळा पासून ४०० ते ५०० मीटरचा अंतरावर बिबट्या दिसला. त्याला बेशुध्द करण्यासाठी डार्ट मारण्यात आला. पण हा प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान चवताळून उठलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला केला. त्यावेळी शार्प शुटरने गोळी झाडत त्यास ठार केले. हा सर्व थरार रात्री साडेदहाचा दरम्यान झाला.

       मारण्यात आलेल्या बिबट्या हा अंदाजे ५ ते ६ वर्षाचा असून ग्रामस्थांना मृत बिबट्याचे शव दाखविल्यानंतर शवविच्छदनासाठी ते माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे हलविण्यात आले आहे.   जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसरंक्षक स्मिता राजहंस अमृत शिंदे यांच्या सह तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यानी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button