Uncategorized

दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळला

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम शिरूर शहरा पासून लगत असणा-या अण्णापूर येथील ढग्या डोंगरालगतचा  शेतात बिबटया मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट्या हा नर असून या बिबट्याचे वय दोन ते अडीच वर्षं इतके आहे.

 शिरूर तालुक्यात सध्या बिबट्याने हैदोस घातला असून बिबट्याच्या वाढत्या संख्येने शिरूर तालुका त्रस्त झाला आहे. तालुक्यातील बेट भागासह पूर्व भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नव्हे तर शिरूर शहरातील घोडनदी काठी असणाऱ्या  सूरजनगर सुशीला पार्क या ठिकाणीही बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले आहे साहजिकच बिबट्याच्या वावराने  शिरूर शहरात भीतीचे व काळजीचे वातावरण असून सुरज नगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला आहे.
 दरम्यान बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी शिरूर शहरालगत असणाऱ्या अण्णापूर येथील ढग्या  डोंगराजवळ बिबटया मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार वनरक्षक गणेश झिरपे,दिनेश बोरड व सर्पमित्र शेख घटनास्थळी गेले. त्यावेळी  ढग्या डोंगरा  येथील उसाच्या शेतात बिबट्या मृता अवस्थेत आढळून आला. या बिबट्यावर शिरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . अण्णापूर व परिसरात बिबट्याचा वावर असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  अण्णापूर व  घोटीमळा  येथे पिंजरा लावण्यात आला आहे.
अण्णापूर व त्या लगतच्या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी केली आहे.
 दरम्यान मागील दहा ते पंधरा दिवसात शिरूर तालुक्यातून १० पेक्ष्या अधिक  बिबटे वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले आहे.
 सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू झाला असून उसामध्ये वास्तव्य करत असणारे बिबटे उसाच्या शेतातून बाहेर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. असे बोलले जाते.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन
मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button