क्राईम

महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीण पोलीसांनी केले जेरबंद

जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस, ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकूण ७,१६,७९३/- रू. किंमतीचा मुद्देमाल  जप्त

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारा दोन आरोपीना पोलीसांनी जेरबंद करून जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत . ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकूण ७,१६,७९३/- रू. किंमतीचा मुद्देमाल  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचा पोलीसांनी केला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मार्च २०२५ रोजी ग इंदूबाई विठ्ठल पानसरे वय ६० वर्षे, व्यवसाय शेती, घरकाम, रा. पिंपळगाव सिद्धनाथ ता. जुन्नर जि. पुणे या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेशखिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र व माळ असा एकूण १ लाख ८० हजार रु . किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले होते. त्याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली होती .
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करणेत आला होता. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फूटेज तपासणेत आले, चोरट्यांनी गुन्हा करते वेळी स्प्लेंडर मोटार सायकलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले व ही मोटार सायकल ही शिरूर बाजुकडे गेली असल्याचे तपासात दिसून आले. त्याअनुषंगाने पथकाने शिरूर परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढून संशयित मोटार सायकल ही अनिल सोमनाथ गव्हाणे व अनिल नारायण गव्हाणे हे वापरत असून ते दाणेवाडी परिसरात असतात. अशी बातमी मिळाल्याने बातमीचे आधारे पथकाने शिरूर परिसरात सापळा लावून १) अनिल सोमनाथ गव्हाणे वय ३१ वर्षे, रा. गव्हाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर, २) अनिल नारायण गव्हाणे वय २५ वर्षे रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले .त्याचबरोबर त्यांनी जुन्नर, शिक्रापूर, शिरूर, आळेफाटा पो स्टे हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचेकडून त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ७,१६,७९३/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. दोन्ही आरोपीना जुन्नर पो स्टे चे ताब्यात देण्यात आले. आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
हा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साो. पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी , जुन्नर पो स्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पो स्टे चे पो नि किरण अवचर, अभिजीत सावंत, अरविंद गटकुळ, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, सागर नामदास, वैभव सावंत, निलेश सुपेकर यांनी केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button